~ अजय दुधाणे
उल्हासनगर : सिंधीबहुल शहर अशी ओळख असलेल्या उल्हासनगरात (Ulhasnagar) चेटीचंद यात्रा काढण्यात आली. सिंधी समाजाचा 'चेटीचंद' (Chetichand Yatra) म्हणजेच नववर्षाची सुरवात असून, या निमित्त शहरातील कॅम्प एक पासून हि यात्रा उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच पर्यंत जाते. ही यात्रा दुपारी निघते आणि रात्री समाप्ती होते. या यात्रेत विविध मुखवटे तसेच विविध चित्ररथ सामील झाले होते.
हे देखील पहा :
तसेच विविध वाजंत्री या नववर्ष स्वागत यात्रेत सामील झाले होते. चेटीचंड हा सिंधीभाषक लोकांचा नववर्ष स्वागताचा सण आहे. सिंधी भाषेत चेट हा शब्द चैत्र महिना या अर्थी येतो. झुलेलाल या सांप्रदायिक देवतेचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. ही देवता म्हणजे वरुण देवता होय. जलाची देवता म्हणून तिची पूजा केली जाते. सिंधी (Sindhi) व्यापारी या दिवशी नव्या खातेवहीची पूजा करतात. सिंधी लोक या दिवशी नृत्याचा आनंद घेतात, एकत्र येऊन परस्परांना शुभेच्छा देतात.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.