MPSC Latest News: एमपीएससीने अभ्यासक्रम आणि परिक्षा पद्धत बदलल्याच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत केलं खरं मात्र, हा निर्णय २०२३ नाही तर २०२५ पासून लागू करावा अशी भूमिका मांडली. विद्येच्या माहेरघरात आज याच मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. (Pune Latest News)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू केली जाणार आहे. याच्या विरोधात पुण्यात आज विद्यार्थ्यांनी आंदोलन (Protest) केलं. याआधी मुख्य परीक्षा (MPSC) ही बहुपर्यायी पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांनी त्याच पद्धतीने अभ्यास केला. आता आयोगाने नव्याने केलेला बदल चांगला असला तरी तो पुढील वर्षांपासून लागू होणार असल्याने इतकी वर्षे केलेल्या अभ्यासाचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सात महिन्यांत पूर्ण होणे शक्य नसल्याने या निर्णयाला प्रचंड विरोध होत आहे.
- दळवी समितीने २ मे २०२२ला आपला अहवाल आयोगाला सादर केला.
- २४ जून २०२२ला अभ्यासक्रमात नवीन बदल करण्याचा निर्णय जाहीर झाला.
- २० जुलै २०२२ला इंग्रजी भाषेत तर १७ ऑक्टोबर २०२२ला मराठी भाषेतील अभ्यासक्रम सादर करण्यात आला.
- नवीन अभ्याक्रमनुसार पहिली परीक्षा ३ जून २०२३ला, तर मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर २०२३ ला होणार आहे.
विद्यार्थ्यांनी आंदोलने केली त्यांचं सरकारने ऐकलं नाही. विरोधी राजकीय पक्षाच्या नेत्यांचही सरकार ऐकतं नसल्याने हे सरकार बेताल सरकार असल्याचा आरोप केला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.