आणि चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले...
आणि चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले...Saam Tv

आणि चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले...

चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला कार्यकर्ते असल्याने त्यांना काही काहीही झालेले नाही.
Published on

अश्विनी जाधव

पुणे - चांदणीचौक येथील कामाची पाहणी करायला आलेले भाजपचे BJP प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे Kothrud आमदार चंद्रकांत पाटील Chandrkant Patil रात्री उशिरा झालेल्या एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पत्रकारांशी संवाद सुरू असताना चांदणी चौकातून येणाऱ्या तीव्र उतारावरून एका चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो गर्दीच्या ठिकाणी धडकला.

हे देखील पहा -

चंद्रकांत पाटील यांच्या आजू बाजूला कार्यकर्ते असल्याने त्यांना काही काहीही झालेले नाही. दुचाकीस्वार दारु प्यायला असावा असे वाटून कार्यकर्त्यांनी त्याला मारायला सुरवात केली. त्यानंतर तिथे चंद्रकांत पाटील थांबा आले आणि त्याला मारू नका असे म्हणत त्या दुचाकीस्वाराला लागले नाही ना याची खातरजमा केली.

आणि चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले...
PCMC: स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीयसहायकांना 'लाच' घेताना रंगेहाथ पकडले

दरम्यान,अधिकाऱ्यांनी चांगले काम केले तर त्यांना चाॅकलेट देणार असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी घोषित केले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी चॉकलेट देखील दिले. मात्र त्याचवेळी चांदणी चौकातील कामा बाबत आपण समाधानी नसल्याचे देखील ते म्हणाले. काम चांगले करावे म्हणून चाॅकलेट देत आहे असे सांगत दादांनी अधिकाऱ्यांना चाॅकलेट वाटले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com