पुणे: लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महानगर (PCMC) पालिकेत धाड टाकत सत्ताधारी भाजपचे (BJP) स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह इतर तीन जणांना अटक केली आणि एकच खळबळ उडाली.
काय घडलं?
-भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत ACB चा सापळा
-वेळ- दुपारी 4
स्थळ- पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य कार्यालय
- 2 लाखांची लाच स्वीकारतांना स्थायी समिती अध्यक्षांचा कार्यालयीन प्रमुख ACB च्या जाळ्यात
पुढच्या एकाच तासात ACB ने पिंपरी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बंद दारा आड त्यांची 2 तास चौकशी केल्या गेली आणि नितीन लांडगे, त्यांचे स्वीयसहायक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका ठेकेदाराला वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी कमिशन म्हणून 9 लाख रुपयांची लाच मागितली होती आणि त्याचा पहिला हप्ता म्हणून 2 लाखांची रक्कम स्वीकारताना लांडगे यांचे स्वीयसहायक पिंगळे पकडल्या गेले. आता सत्ताधारी भाजपचा पदाधिकारीच अटक झाल्यावर विरोधकांनी तोंडसुख घेतलं नसत तरच नवलच.
अर्थात विरोधकांना आपल्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं सांगत. पिंपरीतील भाजप पदाधिकर्यांनी मात्र आज घेतल्या गेलेली लाच केवळ अध्यक्षांसाठी नाहीतर स्थायी समिती मधील सर्व पक्षीय 16 सदस्यांसाठी घेतल्या गेली होती आणि त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोती भापकर यांनी केली आहे.
महापालिकेत घेण्यात आलेल्या लाच प्रकरणात सत्ताधारी भाजपने उशिरा का होईना प्रतिक्रिया दिली आहे. एसीबीला आम्ही तपासात सहकार्य करत आहोत, आम्ही चुकीला पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांच्या सरकार मध्ये काय गोंधळ चाललाय, अधिकारी किती भ्रष्ट आहेत आणि कारभार कसा करतायेत त्याकडे बघावं अशी प्रतिक्रिया भाजपचे पक्ष नेते नामदेव ढाके यांनी दिली आहे. ह्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून पिंपरी मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
सूत्रांच्या माहिती नुसार शहरात होर्डिंग लावणाऱ्या एका ठेकेदाराला 9 लाख रुपय मागण्यात आले होते त्या पैकी 2 लाख रुपये घेतांना स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांचे कार्यालयीन प्रमुख ज्ञानेश्वर पिंगळे यांना रंगेहात पकडण्यात आले तर पिंगळे यांनी स्वीकारलेली लाच स्थायी समिती अध्यक्षांसाठी घेतली असल्याची बाब तपासात समोर आल्याने लांडगेनाही अटक करण्यात आली आहे. एकूणच हा प्रकार भाजपची भ्रष्ट चेहरा उघड पाडणारा असून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.