पुणे महानगरपालिका नेमणार 'ट्रॅपिक प्लॅनर'; पगार ऐकून व्हाल थक्क!
पुणे महानगरपालिका नेमणार 'ट्रॅपिक प्लॅनर'; पगार ऐकून व्हाल थक्क!Saam Tv

पुणे महानगरपालिका नेमणार 'ट्रॅपिक प्लॅनर'; पगार ऐकून व्हाल थक्क!

सल्लागाराची नियुक्ती तीन वर्षांसाठी केली जाणार असून त्याला तब्बल 72 लाखांचा खर्च महापालिका करणार आहे.
Published on

पुणे शहरासाठी (Pune City) ट्रॅफिक जॅम काही नवं नाही. अगदी चुकलेल्या ब्रीज पासुन सुरु असलेल्या विकासकामांपर्यंत कोणतेही कारण वाहतुक कोंडी होणासाठी पुरेसं ठरतं. पण आता हीच वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महापालिका चक्क महिन्याकाठी दोन लाख रुपये मोजणार आहे. महापालिकेने ट्रॅफिक प्लॅनर नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनरसाठी महापालिकेकडून पगार म्हणून तब्बल 2 लाख रुपये मोजले जाणार आहे. या सल्लागाराची नियुक्ती तीन वर्षांसाठी केली जाणार असून त्याला तब्बल 72 लाखांचा खर्च महापालिका करणार आहे.

विशेष म्हणजे या सल्लागाराला दिले जाणारे वेतन हे महापालिका आयुक्तांच्या वेतनापेक्षाही अधिक असणार आहे. त्यातच महापालिकेत शहराच्या वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र अधिकारी आणि विभाग असतानाही या एका पदासाठी एवढ्या पैशाची उधळपट्टी कोणाच्या अट्टाहासाठी असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पुणे महानगरपालिका नेमणार 'ट्रॅपिक प्लॅनर'; पगार ऐकून व्हाल थक्क!
नानासाहेब गायकवाड आणि मुलास पुणे पोलिसांकडून अटक

पुण्यामध्ये आपण अनेकदा ट्राफिक जॅम झालेलं पाहायला मिळतं. जास्त ट्राफिक पुणेकर प्रमुख पेठांमध्ये पाहायला मिळतं. अनेकदा लोकांचा वेळ जातो परिणामी कामाला उशिर होतो. त्यामुळे महापालिकेच्या ट्राफिक प्लॅनरच्या साहय्याने तरी ट्राफिकचा प्रश्न सुटतो का याकडे पुणेकरांच लक्ष लागून आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com