अंबानींच्या अडचणीत वाढ; ईडीनंतर सीबीआयची छापेमारी, १७ हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळ्याचा आरोप

Anil Ambani News: सीबीआयनं अनिल अंबानी यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. प्रकरण १७ हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आहे. या घोटाळ्यामुळे स्टेट बँकेला तब्बल २ हजार कोटींचे नुकसान.
Anil Ambani News
Anil Ambani NewsSaam TV News
Published On
Summary
  • सीबीआयनं अनिल अंबानी यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला.

  • प्रकरण १७ हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आहे.

  • या घोटाळ्यामुळे स्टेट बँकेला तब्बल २ हजार कोटींचे नुकसान.

  • ईडीनंतर आता सीबीआयच्या कारवाईमुळे अंबानींच्या अडचणीत वाढ.

दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तब्बल १७ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने शनिवारी सकाळी मुंबईतील कफ परेड येथील सीविंड या निवासस्थानी छापा टाकला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. ईडीनंतर सीबीआयनं छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सकाळी सातच्या सुमारास सीबीआयचे ७-८ अधिकारी तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. छाप्यादरम्यान अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंब घरी उपस्थित होते. ईडीच्या कारवाईनंतर आता सीबीआयनंही कारवाई सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Anil Ambani News
भाजप आमदारावर डॉक्टरला मारल्याचा आरोप, क्षुल्लक कारणावरून दादागिरी; परिसरात खळबळ

सीबीआयनं रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अंबानी यांच्या प्रोजेक्ट्सशी संबंधित काही ठिकाणी छापे घालत एफआयआर दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीनं १७ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी यांची चौकशी केली होती.

Anil Ambani News
देहविक्रीचं मोठं रॅकेट, तरुणींचे फोटो पाठवायचे, १००० रुपये घेऊन घरीच....; आई-मुलाचा खरा चेहरा उघड

घोटाळ्यातील कथित गैरव्यवहारामुळे स्टेट बँकेला तब्बल २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अंबानी यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी १० दिवसांची मागणी केली होती, मात्र तपासकर्त्यांना अद्याप समाधानकारक माहिती मिळालेली नाही.

अनिल अंबानींच्या ठिकाणांवर सीबीआयचे छापे

१. येस बँकेनं दिलेल्या १७ हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा अंबानींवर आरोप.

२. अनिल अंबानींनी मंजूर कर्ज अन्य कंपन्यांत वळवल्याचा आरोप आहे.

३. अनिल अंबानींनी कागदपत्रे सादर करण्यास १० दिवसांचा मागितला कालावधी.

४. दहा दिवसांचा वेळ न देता सीबीआयची ६ ठिकाणांवर छापेमारी.

५. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतर ठिकाणी छापेमारी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com