

Maharashtra Assembly Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिशन सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यातच आज दिवसभर राज्य सरकार कॅसिनो विधेयक आणणार, हा विषय खूपच चर्चेत राहिला आहे. याशीच संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात कॅसिनो सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी 'साम टिव्ही'ला दिली आहे.
याशी संबंधित विधेयक हे 1976 पासून अस्तित्त्वात आहे. मात्र आता कॅसिनो हा विषय कायमचा संपविण्यासाठी राज्य सरकार नवीन विधेयक आणणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कॅसिनोची घाण नकोच, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच हा विषय कायमचा संपवण्यासाठी विधेयक आणलं जाणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्र कॅसिनोज (नियंत्रण व कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून आहे, पण त्याची अधिसूचना काढलेली नसल्याने त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. (Latest Marathi News)
या कायद्यात कॅसिनोसाठीची परवाना प्रक्रिया, आकारले जाणारे शुल्क, तसेच परवाना रद्द करण्याच्या नियमांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 1887 पासून लागू असलेला मुंबई जुगार प्रतिबंधक कायदाही कॅसिनोला लागू होणार नसल्याचे या कायद्यात स्पष्ट म्हटलेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.