Triple Talaq: धक्कादायक! बायकोला व्हॉट्सअॅपवर दिला तिहेरी तलाक; नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Triple Talaq To Wife On Whatsapp: एका नवऱ्याने बायकोला व्हॉट्सअॅपवर तिहेरी तलाक दिला आहे. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रिपल तलाक
Triple TalaqSaam Tv

सचिन गाढ, साम टीव्ही मुंबई

व्हॉट्सअॅपवर तिहेरी तलाक दिल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. बायकोने नवऱ्याला दुसऱ्या मुलीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांबाबत विचारलं. तेव्हा नवऱ्याने बायकोला चक्क व्हॉट्सअॅपवर तिहेरी तलाक दिला आहे. व्हॉट्सअॅपवर तलाक दिल्याचं ऐकून सर्वांनाच धक्का बसत आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, सहा महिन्यांपूर्वीच अफनान पटेल याचा विवाह झाला (Husband Wife) होता. परंतु लग्नानंतर तो सतत मोबाईलवर चॅट करत. त्याच्या बायकोला वेळ देत नव्हता. यामुळे पत्नी वैतागली होती. तेव्हा एकदा तिने नवऱ्याचा फोन चेक केला. तेव्हा तिच्या पायाखालची जमिनच सरकली. नवरा दुसऱ्या मुलीशी चॅट करत असल्याचं तिच्या समोर आलं. याबाबत तिने नवऱ्याला विचारणा केली होती.

तेव्हा अफनानने बायकोला व्हॉट्सअॅपवर तिहेरी तलाक (Triple Talaq) दिलाय. व्हॉट्सअॅपवर बायकोला तलाक देणाऱ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या लग्नाला फक्त सहा महिने झाल्याची माहिती मिळत आहे. बायकोच्या तक्रारीवरून मालवणी पोलीस ठाण्यात पती अफनान पटेल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायकोला धमकावल्याचा आरोप देखील अफनानवर करण्यात आला आहे.

ट्रिपल तलाक
Divorce: नवऱ्याने तोंडाला केक लावल्याने नवरी भडकली; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट

भारतीय दंड विधान कलम ४९८- अ (पत्नीला क्रूर वागणूक देणे) तसेच ५०४ आणि ५०६ सह मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकारच संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अफनानवर पोलीस पुढील कारवाई करत (Triple Talaq On Whatsapp) आहेत. बायकोला वेळ देत नसल्याचं तिने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या नवऱ्याचे अन्य मुलीशी प्रेमसंबंध आहे, हे तिला नवऱ्याचा मोबाइल पाहिल्यावर समजलं (Talaq News) होतं.

ट्रिपल तलाक
Divorce over Kurkure: कुरकुऱ्यांमुळं संसारात किरकिर वाढली; बायको रुसली, पोलीस ठाण्यात बसली, म्हणतेय घटस्फोट हवाय!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com