KDMC News: महापालिकेचीच जमीन बिल्डरनं बळकावली; केडीएमसीच्या आरक्षित भूखंडावर उभारली बहुमजली इमारत

Builder Build Building On KDMC Plot: केडीएमसीने संबंधित बिल्डर विरोधात केला गुन्हा दाखल केलाय. कल्याण पश्चिमेत महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरच बिल्डरने बहुमजली इमारत उभारल्याचं समोर आलंय.
KDMC News
Builder Build Building On KDMC PlotSaam Tv
Published On

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

अनधिकृत बांधकामन विरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे . कल्याण पश्चिमेकडील मौलवी कंपाऊंड परिसरातील आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलेल्या युसूफ हाईट्स या बहुमजली इमारतीवर कारवाई करण्यात येणार आहे. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी केडीएमसीने बिल्डर सलमान डोलारे यांच्या विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नागरिकांनी घरी घेताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वेबसाईटवर घर अधिकृत आहे की अनधिकृत याची तपासणी करावी असा आवाहन केडीएमसीने केलं आहे. कल्याण पश्चिमेकडील मौलवी कंपाऊंड जवळील परिसरातयुसूफ हाईट्स ही बहुमजली इमारत आहे .केडीएमसीचे खेळाचे मैदान व बेघरांसाठी घरे यासाठी आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून अनधिकृतपणे सदर इमारतिला देण्यात आलेल्या बांधकाम परवानगी व्यतिरिक्त इमारतीमध्ये वाढीव मजल्याचे बांधकाम केल्याचे आढळून आले.

KDMC News
MHADA: मुंबईतील घरांचे स्वप्न पूर्ण होणार, ५ वर्षांमध्ये ३० लाख घरं तयार होणार

याप्रकरणी केडीएमसीने बिल्डर सलमान डोलारे यांच्या विरोधात एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत घर घेताना नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संकेतस्थळावर घर अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत याबाबत पडताळणी करावी असं आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेने केला आहे. तर दुसरीकडे या इमारती मध्ये नागरिकांनी आयुष्याची पुंजी लावून घर घेतले आहे तर कुणी कर्ज काढून घर घेतलं आहे .

KDMC News
Kaali Peeli Taxis : मुंबईची शान असलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या घटली, फक्त 13,000 शिल्लक

या नागरिकांवर कारवाईची टांगती तलवार आहे .केडीएमसी कडून अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनधिकृत बांधकामास जबाबदार केडीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार असा आता केला जात आहेत . दरम्यान कल्याण डोंबिवलीतील अवैध ठरलेल्या ६५इमारतींवर कारवाई होणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या बेकायदा ६५ इमारती येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. आले आहे.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळाल्याचे भासवून 'रेरा' प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविणाऱ्या या इमारतींवर न्यायालयाने कठोर भूमिका घेतलीय. मात्र या कारवाईमुळे या इमारतींमधील हजारो नागरिकांच्या डोक्यावर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. बिल्डरने, प्रशासनाने आमची फसवणूक केलीय. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, अशी मागणी नागरिकांनी केलीय. यावरून घर घेताना नागरिकांनी केटीएमसीच्या संकेतस्थळावर शहानिशा करावी, असं आवाहन केडीएमसीकडून करण्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com