BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग, ६५०० बूथ अधिकारी अन्...; कसा आहे संपूर्ण प्लान?

BMC Election 2025: मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी ६५०० बूथ अधिकारी नेमण्यात आले आहेत.
BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग, ६५०० बूथ अधिकारी अन्...; कसा आहे संपूर्ण प्लान?
BMC Election 2025Saam Tv
Published On

Summary -

  • बीएमसी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

  • या निवडणुकीसाठी ६५०० बूथ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

  • मतदान व्यवस्थापनासाठी ७०,००० कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

  • जानेवारी २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते. या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग आला आहे. निवडणुकांच्या कामाला जोरदार सुरूवात झाली आहे. अशामध्ये बहुप्रतिक्षित बीएमसी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग, ६५०० बूथ अधिकारी अन्...; कसा आहे संपूर्ण प्लान?
Local Body Election: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर फुटणार, किती टप्प्यात होणार निवडणूक?

निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बीएमसी निवडणुकीसाठी ६५०० बूथ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर व्यवस्थापनासाठी ४००० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारकडून एकूण ७०,००० कर्मचारी मतदानाच्या दिवसासह निवडणूक कर्तव्यांवर तैनात केले जातील. बीएमसी प्रशासनाने गेल्या महिन्यापासून त्यांच्या अधिकाऱ्यांना निवडणूक कर्तव्यांसाठी प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, बीएमसी निवडणुका जानेवारी २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नागरी निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदतवाढ ही ३१ जानेवारी रोजी संपणार आहे. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी कर्तव्यांवर तैनात करण्यात आलेले कर्मचारी सर्वाधिक बीएमसीचे होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान एकूण १०,१११ मतदान केंद्रे होती. जी चांगल्या मतदान व्यवस्थापनासाठी ५०० ने वाढवून १००० करण्याची अपेक्षा आहे.

BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग, ६५०० बूथ अधिकारी अन्...; कसा आहे संपूर्ण प्लान?
Local Body Election : पालिका निवडणुका जानेवारीमध्येच? तीन टप्प्यात उडणार निवडणुकींचा बार? VIDEO

तसंच, महानगरपालिकेने त्यांच्या मुख्यालयाच्या तळमजल्यावर एक मुख्य नियंत्रण कक्ष देखील सुरू केले आहे. जिथे त्यांचा माहिती तंत्रज्ञान विभाग देखील आहे. प्रभाग सीमांकनाबाबतच्या सूचना/हरकतींची अलिकडची छाणनी येथे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गेल्या महिन्यात निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बीएमसी मुख्यालयाला भेट दिली होती. मतदार यादीचे विभाजन, प्रस्तावित मतदान केंद्रांचे वर्गीकरण, मतदान यंत्रांची संख्या, मतदान यंत्रांसाठी साठवणुकीची व्यवस्था, निवडणूक साहित्य, मतदान केंद्रांवरील सुविधा, निवडणुकीसाठी आवश्यक असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आला.

BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग, ६५०० बूथ अधिकारी अन्...; कसा आहे संपूर्ण प्लान?
KDMC Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कोण मारणार बाजी? यंदा ठाकरे बंधूंचा करिष्मा चालणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com