Local Body Election : पालिका निवडणुका जानेवारीमध्येच? तीन टप्प्यात उडणार निवडणुकींचा बार? VIDEO

Maharashtra Local Body Election update : महापालिका निवडणुकीचा मुहूर्त ठरलाय.. मात्र राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किती टप्प्यात होणार? एक देश एक निवडणुक या घोषणेची अंमलबजावणी होणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Local Body Election news
Maharashtra Local Body ElectionSaam Tv
Published On

तब्बल 4 वर्षांपासून लांबलेल्या निवडणुकांचा अखेर मुहूर्त ठरलाय.. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे दिवाळीनंतर निवडणूकींचा बार उडणार हे निश्चित झालंय... मात्र निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूका एकाच टप्प्यात घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केल्याने 3 टप्प्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे.. तर जानेवारीमध्येच महापालिकेचे पडघम वाजणार आहेत...मात्र राज्यातील सद्यस्थिती काय आहे? पाहूयात...

Local Body Election news
Manipur Attack : भारताच्या लष्करावर भीषण हल्ला; तुफान गोळीबारात २ जवान शहीद, परिसरात खळबळ

राज्यातील 27 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या, 207 नगरपालिका आणि 13 नगरपंचायतीच्या निवडणूका 4 वर्षांपासून झालेल्या नाहीत.. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे.

Local Body Election news
Saturday Horoscope : वस्तू गहाळ होणार, व्यवसायामध्ये अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

निवडणूक आयोगाने महापालिकांसाठी प्रारुप प्रभाग रचना, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलंय.. मात्र आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितींच्या गणासोबत महापालिकांमधील महापौरपदाचं आरक्षण बाकी आहे.. त्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरु आहे.. त्यानुसार दिवाळीनंतर आधी जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यानंतर नगरपंचायती आणि त्यानंतर जानेवारीमध्येच महापालिका निवडणूका घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

Local Body Election news
Thane Shocking : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; स्टोअर मॅनेजरचा इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

खरंतर एक देश एक निवडणूकीचा नारा दिला जात असताना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर आलीय.. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर निवडणूक आयोग वेळेत निवडणूका घेणार की प्रशासकराज कायम ठेवण्यासाठी लोकशाही स्थगित करुन पुन्हा मुदतवाढ मागणार? याकडे राज्याचं लक्ष लागंलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com