Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर

BMC Home Lottery 2025: मुंबई महानगरपालिकेकडून दिवाळीमध्ये ४२६ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर आहे. या घरांचे लोकेशन काय असणार आहे हे घ्या जाणून...
Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर
BMC Homes Lottery 2025Saam Tv
Published On

Summary -

  • मुंबई महापालिकेकडून दिवाळीत ४२६ घरांसाठी लॉटरी जाहीर

  • १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकता

  • घरांच्या किंमती ५४ लाख ते १.१२ कोटींपर्यंत असणार आहेत

  • भायखळा आणि कांजुरमार्गसह विविध भागांतील घरे लॉटरीमध्ये उपलब्ध

मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याचे अनेकांचा स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई महानगर पालिकेकडून ४२६ घरांसाठी दिवाळीमध्ये लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घर बांधण्याच्या योजनेला सुरूवात केली आहे.सिडको आणि म्हाडाच्या धर्तीवर मुंबई महानगर पालिकेने पहिल्यांदाच घरांसाठी लॉटरी काढली आहे. या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पालिकेने काढलेल्या ४२६ घरांसाठी किती किंमत मोजावी लागणार आहे?, अर्ज करण्याची तारीख काय आहे? त्याचसोबत या घरांचे ठिकाण काय आहे? या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत...

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेला भूखंडाच्या निवासी प्रकल्पातून बिल्डरकडून मिळालेल्या घरांमधील ४२६ घरांसाठी दिवाळीत लॉटरी निघणार आहे. यासाठी आजपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही अर्ज करण्याची प्रक्रिया १४ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. २६ ते ३८ चौरस मीटर चटई क्षेत्र व अल्प आणि अत्यल्प गटासाठी असलेल्या या घरांची किंमत ५४ लाखांपासून ते १ कोटी १२ लाखांपर्यंत असणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या या लॉटरीमध्ये भायखळामधील २७० चौरस फुटांच्या घरांसाठी नागरिकांना तब्बल १ कोटी ७ लाख रुपये मोजावे लागणार आहे. तर कांजुरमार्ग येथील ४५० चौरस फुटांच्या घरासाठी नागरिकांना ९८ लाख ते १ कोटींपर्यंत पैसे मोजावे लागणार आहे.

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर
Pune Mhada Lottery: पुण्यात स्वस्तात मस्त घर, म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

विकास नियंत्रण नियमावली १५ नुसार ४ हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या भूखंडावरील निवासी प्रकल्पातून विकासकाने ८० टक्के घरांची विक्री केल्यानंतर पालिकेला २० टक्के घरे मोफत देणे अनिवार्य आहे. यानुसार पालिकेला ८०० घरे मिळाली आहेत. यामधील आता ४२६ घरांसाठी दिवाळीमध्ये लॉटरी निघणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही लॉटरी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर
MHADA Lottery Cancel : म्हाडा विजेत्यांना मोठा दणका! घराचा ताबा न घेतल्याने हक्क रद्द होणार

१६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली. अर्जदारांना १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम १४ नोव्हेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. सोडत प्रक्रिया २० नोव्हेंबर २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडेल.

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर
Mhada Lottery : ठाण्यात कुणाला लागली लॉटरी? म्हाडाच्या ५३५४ घरांची सोडत जाहीर, अशी पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

पालिकेच्या घरांच्या सोडतीसंदर्भात माहिती पुस्तिका १६ नोव्हेंबर रोजी वेबसाईटवर उपलब्ध केली जाईल. या सोडतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 022-22754553 या मदत सेवा क्रमांकावर किंवा bmchomes@mcedgmed.goved.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा अथवा सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), चौथा मजला, विस्तारित इमारत, पालिका मुख्यालय, फोर्ट इथे संपर्क साधावा.

घरांच्या किंमती आणि ठिकाणं -

कांदिवली - ४ घरं - ८१,७९,२१७ रुपये

कांजूर - २७ घरं - ९७,८६,३९२ रुपये

मरोळ(अंधेरी) - ७८,५०,९१० रुपये

एलबीएस मार्ग ( भांडूप) - २४० घरं - ६३,५०,९८६ रुपये

वाढवण, कांदिवली - ३० घरं - ६३,७७,१६२ रुपये

दहिसर - ४ घरं - ६६,४०,०९० रुपये

प्रेस्टिज, भायखळा - ४२ घरं - १,०१,२५,१०९ रुपये

जोगेश्वरी - ४६ घरं - ५४,२७,४०४ रुपये

पिरामल नगर, गोरेगाव- ५९,१५,६०२ रुपये

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर
Diwali CIDCO Lottery 2025 : दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर, जाणून घ्या कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com