Shahjahan Sheikh : तृणमूल काँग्रेसचे नेते शेख यांच्याविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक; निषेध करत केलं जोडे मारो आंदोलन

Shahjahan Sheikh : आंदोलनादरम्यान भाजप महिला आघाडीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह शाहजहान शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Shahjahan Sheikh
Shahjahan SheikhSaam TV
Published On

अभिजित देशमुख

BJP Women's Protest :

महिलांवर लैंगिक अत्याचार तसेच जमीन बळकवल्याबाबत गुन्हे दाखल असलेल्या पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख विरोधात कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीने निषेध आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान भाजप महिला आघाडीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह शाहजहान शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Shahjahan Sheikh
BJP News : जाहिरनाम्यासाठी BJP घेणार जनमताचा आधार #shorts | Marathi News

शाहजहान शेख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

महिलांवर अत्याचार करणाऱ्या शहाजहान शेख सारख्या आरोपीला पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकार पाठीशी घालते, त्यांना अटक करण्यात येत नव्हती. चौकशी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय यंत्रणांवर देखील शेळके समर्थकांनी हल्ला केला. त्यामुळे शाहजहान शेख यांचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक

पश्चिम बंगालमधील हिंसाचारातील प्रमुख आरोपी म्हणून तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते शाहजहान शेख यांना अखेर पश्चिम बंगाल पोलिसांनी काल अटक केली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार काल त्यांना बशीरहाट न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Shahjahan Sheikh
Palghar Crime News : माथेफिरूकडून दोन सख्ख्या भावांची हत्या; धक्कादायक घटनेनं पालघर हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com