Mayor election : भाजप मुंबईचा वचपा ठाण्यात काढणार, नंबरगेमसाठी तडजोडी, सत्तेसाठी फोडाफोडी?

KDMC politics : महापालिका निवडणुकांनंतर भाजप आणि शिंदेसेना यांच्यात महापौरपदासाठी तीव्र रस्सीखेच सुरू आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकांमध्ये आकड्यांच्या जुळवाजुळवीसाठी नगरसेवक फोडाफोडी, तडजोडी आणि दबावतंत्र वापरले जात असल्याची चर्चा आहे.
Mayor election
Mayor electionSaam TV
Published On

महापालिका निवडणुकीनंतर सत्तेसाठी भाजप आणि शिंदेसेना एकमेकांचे नगरसेवक फोडण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा रंगलीय..मात्र कोणत्या महापालिकेत मित्रपक्षांमध्ये महापौरपदावरुन रस्सीखेच रंगलीय.. आणि आकड्यांच्या जुळवाजुळवीसाठी नगरसेवकांची कशी पळवापळवी होण्याची शक्यता आहे. ? पाहूयात...

महापालिका निवडणुक निकालानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये महापौरपदासाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांच्या पळवापळवीचा थरार शिगेला पोहोचलाय......शिंदेंनी ठाकरेसेना आणि मनसेच्या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत... त्याच दरम्यान नगरसेवक फुटू नयेत म्हणून ठाकरेसेनेनं मात्र सावध पावलं उचलत 11 नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवलंय..जोपर्यंत स्वतंत्र गट स्थापन होत नाही, तोपर्यंत नगरसेवक नॉट रिचेबल राहणार असल्याचा दावा ठाकरेसेनेनं केलाय. हा फोडाफोडीचा खेळ रंगात आला असतानाच संजय राऊतांनी त्याला आणखीच हवा दिलीय... शिंदेसेना भाजपचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय..

Mayor election
Ladki Bahin : ₹१५०० बंद झाले, लाडक्या बहि‍णी संतापल्या, ४ जिल्ह्यातील महिलांचा उद्रेक, रस्त्यावर उतरल्या अन्...

मात्र कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापनेसाठीच्या आकड्यांचं गणित नेमकं कसं आहे? पाहूयात...

कल्याण डोंबिवलीत एकूण 122 नगरसेवक आहेत... त्यापैकी शिंदेसेनेनं 53, भाजपनं 50, ठाकरेसेनेनं 11, मनसेनं 5 तर काँग्रेसनं 2 तर पवारांच्या राष्ट्रवादीनं 1 जागा पटकावलीय.. मात्र बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे...त्यापैकी भाजपला सोडून सत्ता स्थापन करायची असेल तर शिंदेसेनेला ठाकरेसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या 09 नगरसेवकांची गरज आहे..

Mayor election
BMC Mayor Election: फडणवीसांचा महापौर नको म्हणून शिंदेंचे प्रयत्न - राऊतांचा खळबळजनक दावा

खरंतर कल्याण डोंबिवली महापालिकेतील फोडाफोडीचं आणि दबावतंत्राचं लोण आता ठाण्यातही पोहोचलंय.. मुंबईत शिंदेसेनेकडून अडीच वर्षांचं महापौरपद मागितल्यानंतर भाजपनंही शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच घेरेबंदीला सुरुवात केलीय... दोन वर्षांसाठी ठाण्याचं महापौरपद देण्याची मागणी भाजपनं केलीय तर यावर शिंदेसेनेनं मात्र सावध भूमिका घेतलीय..

Mayor election
Mayor Election : भाजपची ठाकरेसेनाला महापौरपदाची ऑफर, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

ठाण्यात 131 पैकी शिंदेसेनेनं 75 तर भाजपनं 28 जागा जिंकल्या आहेत... मात्र त्यानंतरही भाजपनं महापौरपदावर दावा सांगितलाय.. तर कल्याण डोंबिवली महापालिकेतही शिंदेसेनेची कोंडी केलीय... त्यामुळे शिंदे ठाकरेसेना आणि मनसेच्या नगरसेवकांना गळाला लावून कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करणार की भाजपसोबतच मुंबईच्या महापौरपदावर समेट घडवून केडीएमसीचं महापौरपद पटकावणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

Mayor election
Mumbai Mayor election : ठाकरे-फडणवीसांमध्ये मुंबई महापौरावर चर्चा झाली का? राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com