मतदानाच्या आदल्या दिवशी कारमध्ये कोट्यवधी रुपये; भाजप-शिंदेसेनेत मध्यरात्री राडा

Cash In Car Row Bjp Shinde Sena Navi Mumbai: नवी मुंबईत एका कारमध्ये कोट्यवधी रुपये आणल्याच्या आरोपावरून शिंदेसेना आणि भाजपात मोठा राडा झाला...अर्ध्या रात्री झालेल्या या हायहोल्टेज ड्रामात कुणाची कार होती ?आणि कोणत्या खासदारानं यात उडी घेतली?
Police and election officials inspect a car amid BJP–Shinde Sena clash over alleged cash in Navi Mumbai.
Police and election officials inspect a car amid BJP–Shinde Sena clash over alleged cash in Navi Mumbai.Saam Tv
Published On

महापालिका निडणुकीत सगळीकडेच पैशांचा पाऊस पडतोय. याला नवी मुंबईही अपवाद नाही. नवी मुंबईत पैसे वाटल्याच्या आरोपवरून थेट भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. नवी मुंबईतल्या वाशीच्या सेक्टर ९ मध्ये नूर मशीद परिसरात रात्री एका गाडीत कोट्यवधी रुपये आणल्याचा आरोप करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी पोलिसांना पकडून दिली. ही गाडी शिंदेसेनेच्या नेत्याची असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला.

त्यामुळे मध्य रात्री या परिसरात मोठा राडा झाला. पोलिसांसमोरच दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे हे प्रकरण वाढले. मग भाजप नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यात मग शिंदेसेनेच्या मोठ्या नेत्यांनी उडी घेतली. शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के हे देखील तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.

य़ा सर्वांसमोर पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी या संशयित गाडीतल्या प्रत्येक कोपऱ्याची कसून तपासणी केली. मात्र या तपासणी दरम्यान गाडीत ना पैसे सापडले ना नोटांचे बंडल.....राजकीय नेते आणि पोलिसांमधील साटेलोटं काही नवीन नाही आणि त्यामुळेच या गाडीत असलेले पैसे मोठ्या खुबीनं गायब करण्यात आले आणि या प्रकरणावर पडदा टाकण्यात आल्याची जोरदार चर्चा नवी मुंबईत रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com