Ganpat Gaikwad News: आमदार गणपत गायकवाड यांना दुहेरी झटका; गुन्हा दाखल होताच आमदारकीही जाणार?

MLA Ganpat Gaikwad News: पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाकडे पाठवण्यात आली आहे.
Ganpat Gaikwad Latest News
Ganpat Gaikwad Latest NewsSaam TV
Published On

BJP MLA Ganpat Gaikwad News

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हिललाईन पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक देखील केली आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या अटकेनंतर आता त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ganpat Gaikwad Latest News
Mla Ganpat Gaikwad: गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदे पिता-पुत्रांवर केले गंभीर आरोप

पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड (Mla Ganpat Gaikwad) यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष याबाबत काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे. यामध्ये एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

सध्या आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे इतर तीन साथीदार गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. शुक्रवारी दुपारी सर्व आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जमिनीचा वाद आणि आपसातील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.

घटना नेमकी कशी घडली?

उल्हासनगरमधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात काही कारणाने बाचाबाची झाली. यावेळी आमदार गायकवाड यांनी महेश आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. यात महेश गायकवाड यांना ५ गोळ्या लागल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ganpat Gaikwad Latest News
Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळातून मला कधीही बाहेर काढू शकतात; मंत्री छगन भुजबळांचं मोठं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com