BJP Leader: मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याच्या कारला भीषण अपघात

BJP Leader Haji Arafat Sheikh: भाजप नेते आणि सामाजिक कार्यकर्ते हाजी अराफत शेख यांच्या वाहनाचा पनवेल परिसरात अपघात झाला आहे.
BJP leader
BJP leaderSaam
Published On

भाजप नेते आणि सामाजिक कार्यकर्ते हाजी अराफत शेख यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. त्यांचा अपघात पनवेल परिसरात झाला असून, या अपघातात त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हाजी अराफत शेख हे पनवेलच्या दिशेने प्रवास करत असताना, समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्यामुळे त्यांचे वाहन त्यावर आदळले. यामध्ये त्यांना पायाला दुखापत झाली असून, वाहनाचेही नुकसान झाले आहे. घटनेनंतर शेख यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं.

BJP leader
Yojana: मुलीच्या नावाने दररोज फक्त ₹१६७ गुंतवा अन् २८ लाख परत मिळवा, वाचा सरकारची सुपरहिट योजना

त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाले असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासणीला सुरूवात केली आहे.

BJP leader
Crime News: हॉटेलमध्ये सासूकडून सुनेला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न; परपुरूषासोबत शारीरिक संबधाची बळजबरी अन्..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com