भाजप एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला खिळखिळा करणार? महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, स्वबळावर लढण्याचे संकेत

Eknath Shinde Shivsena v/s BJP: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पक्ष कार्यलयात पूर्वतयारी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
Eknath Shinde Shivsena v/s BJP
Eknath Shinde Shivsena v/s BJPSaam
Published On
Summary
  • महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर.

  • एकनाथ शिंदे यांच्या गडाला भाजप सुरूंग लावणार?

  • इच्छुक उमेदवारांची आज शाळा घेतली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. ठाण्यातही शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून तयारी सुरू आहे. ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याकरिता पक्षाने बारीकसारीक बाबींवर लक्ष केंद्रीत केलंय. याच पार्श्वभूमीवर भाजपाने पक्ष कार्यालयात पूर्वतयारी अभ्यास वर्गाचे आयोजन केले होतं. महापालिकेतील ३३ प्रभागातील इच्छुक उमेदवारांची परिक्षा आज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडली.

या परिक्षेतून उमेदवाराची पक्षाची धोरणे, भूमिका, प्रभागासाठी केलेले कार्य याबाबत संबंधित उमेदवाराकडून आढावा घेण्यात आला. तसेच पक्षासाठी उमेदवाराने केलेल्या कामांची माहिती देखील घेण्यात येईल. यावेळी उपस्थित उमेदवारांना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाची धोरणे, भूमिका, निकष आणि पक्षासाठी काय योगदान देऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन देण्यात आले.

Eknath Shinde Shivsena v/s BJP
“ऑल इज वेल!” रेल्वे स्थानकावर महिलेला प्रसुती कळा, व्हिडिओ कॉलवर डॉक्टरची मदत घेऊन 'रँचो'नं केली डिलिव्हरी

यावेळी इच्छुक उमेदवारांकडून परिचय पत्र भरून घेण्यात आले. या विशेष अभ्यास वर्गाचे मार्गदर्शन आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक आणि संदीप लेले यांनी केले.

महापौरपदावरून राजकीय वाद

राज्यात सत्तेवर असलेली महायुती आगामी निवडणूक एकत्र लढवणार, असे वारंवार संकेत नेते मंडळींकडून देण्यात येत आहे. मात्र, ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद कायम चव्हाट्यावर आला आहे. वनमंत्री गणेश नाईक हे शिवसेना शिंदे गटावर कायम टीका करतात. तर, शिवसेना शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के नाईकांच्या टीकेला प्रत्युत्तर देतात.

Eknath Shinde Shivsena v/s BJP
'बाबांच्या घरी तुमच्या मुलीला..' अश्लील व्हिडिओ पाहून वृद्धेचे भयानक कृत्य, ७ वर्षीय मुलीचा छळ, पुणे हादरलं

आमदार संजय केळकर यांनी महापौरपद भाजपच्या वाट्याला यावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. याला प्रत्युत्तर देताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, 'महापौर कुणाचा होणार? खरंतर हे जनता ठरवेल', असं म्हस्के म्हणाले होते. यामुळे ठाण्यात महायुतीतील संबंध अधिक ताणले गेले असल्याचं चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com