'बाबांच्या घरी तुमच्या मुलीला..' अश्लील व्हिडिओ पाहून वृद्धेचे भयानक कृत्य, ७ वर्षीय मुलीचा छळ, पुणे हादरलं

Seven-Year-Old Girl in Pune Victim of Elderly Mans Misconduct: पुण्यातील लोहगावातून धक्कादायक बातमी. वृद्ध व्यक्तीकडून सात वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य. पीडितेच्या कुटुंबाकडून पोलीस ठाण्यात धाव.
Seven-Year-Old Girl in Pune Victim of Elderly Mans Misconduct
Seven-Year-Old Girl in Pune Victim of Elderly Mans MisconductSaam Tv News
Published On
Summary
  • सात वर्षांच्या मुलीसोबत वृद्ध व्यक्तीचे असभ्य वर्तन.

  • घरातीलच चिमुकलीकडून घटना उघडकीस.

  • आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.

पुण्यातील लोहगाव परिसरातून संतापजनक बातमी समोर येत आहे. घरातील चिमुकलीच्या मैत्रिणीसोबत वृद्ध व्यक्तीनं अश्लील कृत्य केलं आहे. हा संपूर्ण प्रकार घरातीलच लहान मुलीनं उघडकीस आणला. यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच वृद्धा व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी, पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार लोहगाव परिसरातून उघडकीस आला आहे. पीडित मुलगी आरोपीच्या घरी ये-जा करीत होती. आरोपीच्या कुटुंबातील मुलीसोबत खेळायला जात होती. मात्र, वृद्ध आरोपी मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून मुलीसोबत अश्लील वर्तन करीत होता. तसेच नको तिथे स्पर्श करीत होता.

Seven-Year-Old Girl in Pune Victim of Elderly Mans Misconduct
“ऑल इज वेल!” रेल्वे स्थानकावर महिलेला प्रसुती कळा, व्हिडिओ कॉलवर डॉक्टरची मदत घेऊन 'रँचो'नं केली डिलिव्हरी

वृद्ध व्यक्ती घरी आलेल्या मुलीसोबत योग्य वर्तन करीत नसल्याचं एका मुलीच्या निदर्शनास आले. तिनं पीडित मुलीच्या घरी जाऊन हा सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. 'माझ्या वडिलांच्या घरी तुमची मुलगी खेळायला पाठवू नका', असं म्हणत तिनं सगळी माहिती दिली.

यानंतर पीडितेच्या आईनं चिमुकलीला यासंदर्भात विचारपूस केली. सर्वात आधी चिमुकली प्रचंड घाबरली. नंतर चिमुकलीला विश्वासात घेतल्यानंतर घडलेला सर्व प्रकार तिनं आईला सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी त्वरीत विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

Seven-Year-Old Girl in Pune Victim of Elderly Mans Misconduct
राजकारणात नवा भूकंप! माणिकराव कोकाटेंच्या घरात भाजपचा झेंडा, लहान भावाकडून ठाकरेंना राम-राम

या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com