
अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी
Dombivli : डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी पक्षातून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपची ताकद कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजप पक्षाला राम राम ठोकला आहे. स्थानिक नेतृत्त्वाकडून सहकार्य आणि निधी अभावामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. याआधीही म्हात्रे दांपत्याने पक्षाला राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.
विकास आणि कविता म्हात्रे यांनी या वर्षभरात दुसऱ्यांदा पक्षातून राजीनामा दिला आहे. याआधी ज्यावेळेस त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांची समजूत काढली होती. समजुतीनंतर दोघेही पदावर परतले होते. त्यानंतर आता म्हात्रे दांपत्याने पुन्हा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळेस विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांनी थेट भारतीय जनता पक्षाचे कल्याण-डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार परब यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. या राजीनाम्यामुळे डोंबिवलीत भाजपामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांच्या आधीच अंतर्गत मतभेदाचे पडसाद उफाळून येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.