Maratha Morcha: मातोश्रीबाहेर आंदोलनामागे भाजप? मराठा ठोक मोर्चाचा मातोश्रीबाहेर ठिय्या

Maratha Morcha: मातोश्रीवर मराठा आंदोलकांना भेट नाकारल्यानं मराठा बांधवांनी ठाकरेंच्या घरावर मोर्चा काढला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. मात्र आंदोलनावरु आता राजकारण तापलंय.
Maratha Morcha: मातोश्रीबाहेर आंदोलनामागे भाजप? मराठा ठोक मोर्चाचा मातोश्रीबाहेर ठिय्या
Maratha Morcha
Published On

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत राजकीय पक्षांनी भूमिकास्पष्ट करावी अशी मागणी करत मराठा क्रांती ठोक मोर्चाने उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर सलग दोन दिवस धडक दिली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मात्र उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलवलाय. पंतप्रधान मोदींनी आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी ठाकरेंनी केली.

मात्र या आंदोलनामागे भाजप असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. या आंदोलनात सहभागी असलेले सुशील पायाळ हे भाजपचे पदाधिकारी असल्याचा दावा ठाकरे गटानं केलाय. त्यांचे भाजप नेत्यांसोबतचे फोटोही ठाकरे गटानं प्रसिद्ध केले आहेत. विशेष म्हणजे पायाळ हे मराठा नसल्याचाही दावा ठाकरे गटानं केलाय. त्यामुळे या आंदोलनावरून वाद निर्माण झालाय. या आंदोलनाच्या वादात मनोज जरांगेंनीही उडी घेतलीय. मातोश्री बाहेरचं आंदोलन म्हणजे डाव असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय.

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मराठा ठोक मोर्चानं मातोश्रीबाहेर आंदोलन केलं. ठोक मोर्चानं शरद पवार, अजित पवार आणि फडणवीसांच्या घराबाहेरही आंदोलनाचा इशारा दिलाय. मात्र या आंदोलनामागे भाजप असल्याचा आरोप होताच उद्धव ठाकरेंनीही आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलवत भाजपवरच डाव उलटवण्याचा प्रयत्न केलाय.

Maratha Morcha: मातोश्रीबाहेर आंदोलनामागे भाजप? मराठा ठोक मोर्चाचा मातोश्रीबाहेर ठिय्या
Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली; सलाईन सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com