Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का, पहिला नगरसेवक फुटला? कोणत्या पक्षात जाणार?

Big Shock to Uddhav Thackeray in Mumbai: मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. विजयी झालेल्या एका नगरसेविकेने उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची चर्चा होत आहे. आज शिवसेना भवनमध्ये झालेल्या बैठकीत ही नगरसेविका गैरहजर होती.
Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का, पहिला नगरसेवक फुटला? कोणत्या पक्षात जाणार?
uddhav thackeray news Saam tv
Published On

Summary -

  • मुंबईत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

  • ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटल्याची चर्चा

  • सरिता म्हस्के बैठकीला गैरहजर

  • शिंदे गटात जाण्याची शक्यता

राज्यातील २९ महानगर पालिकांमध्ये महापौरांच्या निवडीवरून राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिला. तर ठाकरेसेनेच्या चार नगरसेवकांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली. या धक्क्यानंतर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या नगरसेविकेने पक्षाची साथ सोडली.

मुंबईतल्या प्रभाग क्रमांक १५७ मधून विजयी झालेल्या डॉ. सरिता म्हस्के शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची माहिती समोर आली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची दादरमधील शिवसेना भवनमध्ये बैठक झाली. या बैठकीला सरिता म्हस्के या गैरहजर होत्या. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे. सरिता म्हस्के या आमच्या संपर्कात असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली.

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का, पहिला नगरसेवक फुटला? कोणत्या पक्षात जाणार?
Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सरिता म्हस्के यांनी मुंबईतील प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडणूक लढवली होती. याठिकाणी त्यांनी भाजपच्या उमेदवार आशा तायडे यांचा पराभव केला होता. पण आज त्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीला आल्या नाही त्यामुळे त्या फुटल्या असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागल्या असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का, पहिला नगरसेवक फुटला? कोणत्या पक्षात जाणार?
BMC Mayor Election: फडणवीसांचा महापौर नको म्हणून शिंदेंचे प्रयत्न - राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई महानगर पालिकेच्या २२७ प्रभागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक विजयी झाले. भाजपचे ८९ नगरसेवक विजयी झाले आणि भाजप मुंबईत सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाचे २९ नगरसेवक, काँग्रेसचे २४ नगरसेवक, एमआयएमचे ८, मनसेचे ६ नगरसेवक विजयी झाले आहेत. आता महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चढाओढ सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी केली. शिंदे गटाकडून मॅजिक फिगर गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का, पहिला नगरसेवक फुटला? कोणत्या पक्षात जाणार?
BMC Election: शिंदेसेनेमुळे भाजपची सेंच्युरी हुकली? भाजपनं फोडलं शिंदेसेनेवर खापर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com