BMC Election: शिंदेसेनेमुळे भाजपची सेंच्युरी हुकली? भाजपनं फोडलं शिंदेसेनेवर खापर
मुंबई महापालिकेत भाजपची सेंच्युरी हुकली
शिंदेसेनेच्या कामगिरीवर भाजपचा ठपका
हॉटेल पॉलिटिक्समुळे महायुतीची प्रतिमा डागाळल्याचा आरोप
मुंबई महापालिकेत महायुतीने बहुमताचा आकडा पार तर केला मात्र महापौर निवडीआधीच भाजप आणि शिंदेसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आलेत. शिंदेसेनेच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भाजपला बसला. त्यामुळे भाजपची सेंच्युरी हुकल्याचा आरोप भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला पाठवलेल्या अहवालात केलाय. एवढंच नाही तर शिंदेसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्समुळे महायुतीची प्रतिमा डागाळल्याची तक्रारही केंद्रीय नेतृत्वाकडे करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. भाजप आणि शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट नेमका किती आहे.पाहूयात.
भाजपनं मुंबई महापालिकेत 227 पैकी 136 जागा लढवल्या होत्या.. त्यापैकी भाजपनं 89 जागा जिंकल्या आहेत.. त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट 65.44 टक्के इतका आहे. तर शिंदेसेनेनं 91 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ 29 जागांवर शिंदेसेनेनं जिंकल्या असल्यानं शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट 32 टक्के इतका आहे. दुसरीकडे जागावाटपात भाजपनं जाणीवपूर्वक मुस्लीम भागातील जागा दिल्याचा आरोप शिंदेसेनेने केलाय. एवढंच नाही तर भाजपनं मदत न केल्यानं 11 जागा पडल्याचंही म्हटलंय.कोणत्या ठिकाणी शिंदेसेनेचा काठावर पराभव झालाय.पाहूयात.
यामध्ये वॉर्ड 121 अंधेरी पूर्व मधील प्रतिमा खोपडे फक्त 14 मतांनी पराभूत झाल्या,
वॉर्ड 32 चारकोप येथील मनाली भंडारी 84 मतांनी पराभूत,
तर वॉर्ड 128 घाटकोपर पश्चिम अश्विनी हांडे 158 मतांनी पराभूत,
प्रिया सरवणकर 197 मतांनी दादर मधून पराभूत,
तर समाधान सरवणकर 603 मतांनी वॉर्ड 194 प्रभादेवी मधून पराभूत
हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला इथंच थांबलेला नाही... तर भाजपनं लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीतही मदत न केल्यामुळेच शिंदेसेनेचा पराभव झाल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केलाय. तर आरोप प्रत्यारोपांची राळ उडाल्यानं भाजपनं मात्र सावध भूमिका घेतलीय.
भाजपनं जास्त जागा लढवल्या असत्या तर काठावरच्या बहुमताऐवजी मोठं बहुमत मिळालं असतं. एवढंच नाही तर भाजपचीही सेंच्युरी झाली असती.अशी भावना भाजपच्या नेत्यांमध्ये निर्माण झालीय. आता भाजप आणि शिंदेसेनाही एकमेकांवर खापर फोडत असल्यानं आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेतील धुसफूस वाढत गेल्यास त्याचा फटका महायुतीला बसण्याचीच शक्यता अधिक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

