पुण्यात मोठी राजकीय घडामोड
ठाकरेंच्या बड्या नेत्याने सोडली साथ
ओंकार तुपे यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह केला प्रवेश
एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे ६ विश्वासू खासदार फोडल्याची चर्चा सुरू आहे. अशातच पुण्यामध्ये भाजपने ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. पुणे जिल्ह्यातील ठाकरेंच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे.
युवासेना आणि शिवसेनेत तब्बल ११ वर्षे सक्रिय असलेले उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकला. त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. ओंकार शिवाजी तुपे यांनी आज मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते भाजपचं कमळ हाती घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
गेल्या ११ वर्षांपासून युवासेना आणि शिवसेनेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या ओंकार तुपे यांनी भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. ओंकार तुपे यांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात युवा मोर्चाची ताकद वाढणार असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. तर ठाकरे गटासाठी हा आणखी एक राजकीय धक्का मानला जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या ९ लोकसभा खासदारांपैकी ६ खासदार पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. यामधील आणखी दोन खासदारांनी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील यांच्याव्यतिरिक्त अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे देखील उद्धव यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले जात आहे. पण आज शिंदेंचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे गटातील ६ लोकसभा खासदारांनी पक्ष बदलून शिंदे गटात प्रवेश केला.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.