Mumbai Local: मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटका, १० ते १२ नवीन लोकल धावणार; मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान
Mumbai LocalSaam Tv

Mumbai Local: मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटका, १० ते १२ नवीन लोकल धावणार; मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण त्यांचा लोकल प्रवास गर्दीमुक्त होणार आहे. यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जबरदस्त प्लान तयार केला आहे. या मार्गावर १० ते १२ नव्या लोकल धावणार आहेत.
Published on

Summary -

  • मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे

  • गर्दीच्या वेळी १० ते १२ नवीन लोकल धाववणार

  • जानेवारीत नवीन वेळापत्रक लागू होण्याची शक्यता

  • मुंबईकरांचा प्रवास गर्दीमुक्त होईल

रेल्वे प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होण्याची शक्यता आहे. कारण गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे मार्गावर १० ते १२ नवीन लोकल धावणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होईल. रेल्वे प्रशासनाचा नेमका प्लान काय आहे आणि कधीपर्यंत या नवीन लोकल मिळणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी नवीन वेळापत्रक दरवर्षी नोव्हेंबरमध्ये लागू होत असते. पण यंदा ते जानेवारीमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. पायाभूत सुविधांच्या कामांमुळे नवीन वेळापत्रक लागू करण्यास उशिर झाला आहे. मध्य रेल्वेच्या ऑपरेशन्स विभागाने नवीन वेळापत्रकाबाबत बोर्डाला प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार, काही लांबपल्ल्याच्या ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनसकडे वळवल्या जातील. जर हे असं झालं तर गर्दीच्या वेळी मुख्य मार्गावर लोकल वाहतूकीत अडथळे येणार नाहीत. त्यामुळे जवळपास १० ते १२ लोकलची संख्या आणखी वाढेल. यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल.

Mumbai Local: मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटका, १० ते १२ नवीन लोकल धावणार; मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान
Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

एका लोकलमध्ये अंदाजे २,५०० प्रवासी प्रवास करतात. जर १० लोकल वाढल्यावर अंदाजे २५,००० प्रवाशांना फायदा होईल. यामुळे लोकलची प्रवासी क्षमता वाढेल. महत्वाचे म्हणजे, लवकरच मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या १५ डब्यांच्या लोकलची संख्या देखील वाढेल. यामध्ये जलद आणि धिमी या दोन्ही लोकलचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या २७ रेल्वे स्थानकांच्या विस्ताराचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर अधिक डब्यांच्या म्हणजे १५ डब्यांच्या लोकल चालवणे शक्य होईल. सुरूवातीच्या टप्प्यात १२ डब्यांच्या १० लोकल १५ डब्यांच्या होतील. त्यानंतर त्याची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल. या बदलामुळे प्रवाशांना फायदा होईल आणि गर्दी कमी होण्यास मदत होईल.

Mumbai Local: मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटका, १० ते १२ नवीन लोकल धावणार; मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान
Mumbai Local : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! बोरिवली पुढेही धावणार लोकल, एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्गिका, काय आहे नेमका प्लॅन ? वाचा

लवकरच मध्य रेल्वे मार्गावर एक नवीन एसी लोकल येणार आहे. जानेवारीपर्यंत नवीन एसी लोकल येऊ शकते. यावेळी हार्बर लाईनवर ही एसी लोकल चालवण्याचा प्लान आखला जात आहे. खरं तर काही वर्षापूर्वी हार्बर लाईनवरील प्रवाशांनी एसी लोकलला विरोध केला होता. पण आता या मार्गावर एसी लोकलची मागणी वाढत आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला पत्रे देखील पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता या मार्गावर पुन्हा एसी लोकल सुरू करण्यात येण्यार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर एकूण १८१० लोकल धावतात. तर पश्चिम रेल्वे मार्गावर १४०६ लोकल धवतात.

Mumbai Local: मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटका, १० ते १२ नवीन लोकल धावणार; मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान
Mumbai Local : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल सेवा खोळंबली, ठाण्याकडे जाणारी मार्गिका ठप्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com