Bhivandi Flood : कामवारी नदीचं रौद्ररूप, ट्रॅव्हलर गेली वाहून; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Bhivandi Kamvari river : भिवंडीतील कामवारी नदीला आलेल्या पुराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काठावरच उभी असलेली ट्रॅव्हलर व्हॅन या पुराच्या पाण्यात वाहून गेली.
Bhivandi Flood : कामवारी नदीचं रौद्ररूप, ट्रॅव्हलर गेली वाहून; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल
Bhivandi Flood : कामवारी नदीचं रौद्ररूप, ट्रॅव्हलर गेली वाहून; धडकी भरवणारा VIDEO व्हायरलCHATGPT
Published On

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा पाऊस आता काहीसा शांत झाला आहे. मात्र, मुंबईची उपनगरं आणि बाजूच्या ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासून तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं धरणंही ओसंडून वाहत आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्येही जोरदार पाऊस कोसळला. त्यात धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने कामवारी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. कामवारी नदीने धारण केलेल्या रौद्ररुपाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारयल होत आहे. याच नदीकाठावर असलेली एक ट्रॅव्हलर व्हॅन या नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे.

भिवंडी परिसर आणि धरण क्षेत्रात काल रात्रीपासून पावसाची बॅटिंग सुरू होती. या पावसामुळे धरणे पूर्णपणे भरली आहेत. खबरदारी म्हणून धरणांतील पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. भिवंडी शहरातील कामवारी नदीपात्रात या धरणाचं पाणी सोडण्यात आलं. त्यात पावसाचीही दमदार बॅटिंग सुरू होती. त्यामुळं कामवारी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली आणि पूरस्थिती निर्माण झाली. कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. नदीचे पाणी काठावरील परिसरात शिरायला सुरुवात झाली होती. भाजी मार्केट, तीन बत्ती नाक्याच्या परिसरात गुडघाभर पाणी साचले होतं. यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. सोशल मीडियावर भिवंडीतील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कामवारी नदी दुथडी वाहत आहे. नदीच्या काठावर उभी असलेली एक ट्रॅव्हलर व्हॅन पुराच्या प्रवाहात वाहून गेली. सुदैवाने व्हॅनमध्ये कोणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली. या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bhivandi Flood : कामवारी नदीचं रौद्ररूप, ट्रॅव्हलर गेली वाहून; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल
Raigad News: धबधब्यावर रिल्स बनवताना पाय घसरला, खोल दरीत पडून ठाण्याच्या तरुणाचा मृत्यू

नदीच्या आसपासच्या परिसरात पाणी साचले होते. तीन बत्ती परिसरातील दुकाने, बाजारपेठा, भाजी मार्केट परिसर पाण्याखाली गेला होता. या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं होतं. जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Bhivandi Flood : कामवारी नदीचं रौद्ररूप, ट्रॅव्हलर गेली वाहून; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल
Malshej Ghat Closed : माळशेज घाट वाहतुकीसाठी आजही बंद; पर्यटकांचे अतोनात हाल, पर्यायी मार्ग कोणते?
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com