Bhiwandi Politics: भिवंडीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा, जगन्नाथ पाटील यांनी फडणवीसांकडे मागणी

BJP News: भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यात अलबेल असल्याचे दाखवले जात असले तरी मात्र यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं चित्र आहे.
भिवंडीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा, जगन्नाथ पाटील यांनी फडणवीसांकडे मागणी
Jagannath PatilSaam Tv

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार कपिल पाटील व भाजप आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी या दोघांमध्ये समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यात अलबेल असल्याचे दाखवले जात असले तरी मात्र यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं चित्र आहे. याचे कारण म्हणजेच निवडणुकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी किसान कथोरे यांनी समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप करत किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

भिवंडीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा, जगन्नाथ पाटील यांनी फडणवीसांकडे मागणी
EVMपूर्वी पोस्टल मतांची मोजणी करा, इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

या पत्रात जगन्नाथ पाटील यांनी मुरबाड विधानसभेतील आगरी भागात तुतारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार उमेदवार बाळ्या मामा यांना मतदान करायला सांगितलं. कुणबी भागात शिलाई मशीन म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना मतदान करायला कार्यकर्त्यांना सूचना केली. या संदर्भातला माझ्याकडे सर्व पुरावा असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केलाय.

भिवंडीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा, जगन्नाथ पाटील यांनी फडणवीसांकडे मागणी
Maharashtra Politics: पडदा बाजूला करुन उद्धव ठाकरेंच्या NDAसोबत येण्याच्या थेट हालचाली सुरू, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा

याबाबत जगन्नाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवत भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी मुरबाडचे भाजपचे किसन कथोरे यांनी समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप करत किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com