Bhayandar News
Bhayandar NewsSaam Digital

Bhayandar News : भाईंदरमध्ये मोठी दुर्घटना; इमारतीची भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Bhayandar Building Collapsed : भाईंदरमधून मोठी दुर्घटना घडली आहे. भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीच्या सदनिकेची भिंत कोसळली असून यात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे.
Published on

भाईंदरमधून मोठी दुर्घटना घडली आहे. भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीच्या सदनिकेची भिंत कोसळली असून यात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. नवघर पोलीस ठाण्यासमोरील श्रीनाथ ज्योती बिल्डिंगमध्ये तळ मजल्यावर एका सदनिके़चे दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि मजुरांना तात्काळ बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाकल केलं, मात्र दोन मजुरांना मृत्यू झाला आहे. हरिनाम चौहान (वय ५५,) आणि मखनलाल यादव (वय २६) अशी मृत कामगारांची नावं आहेत. तर आकाश कुमार यादव जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com