Bharat Jodo Nyay Yatra : मुंबईत इंडिया आघाडीची जंगी सभा; देशातील कोणते नेते उपस्थित राहणार? यादी पाहा

Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधी यांची यात्रा मुंबईत पोहोचल्यानंतर रविवारी इंडिया आघाडीची एक जंगा सभा होणार असून या सभेला देशातील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहे. या बड्या नेत्यांची हाती आली आहे
Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo Nyay Yatra Saam tv
Published On

Rahul Gandhi Latest news :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची रविवारी सांगता होणार आहे. आज शनिवारी राहुल गांधी यांची यात्रा मुंबई पोहोचली आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थितीत दिसत आहे. राहुल गांधी यांची यात्रा मुंबईत पोहोचल्यानंतर रविवारी इंडिया आघाडीची एक जंगा सभा होणार असून या सभेला देशातील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहे. या बड्या नेत्यांची हाती आली आहे. (Latest Marathi News)

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूरपासून सुरु झाली. राहुल गांधी यांच्या या यात्रेचा मुंबईत समारोप होणार आहे. आज राहुल गांधी यांची यात्रा मुंबईला पोहोचली. आज मुंबईत आल्यानंतर राहुल गांधी हे दादरमधील चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत.

राहुल गांधी यांची सभा मुंबईत पोहोचल्यानंतर इंडिया आघाडीची जंगी सभा होणार आहे. इंडिया आघाडीची उद्या शिवाजी पार्कात सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

Bharat Jodo Nyay Yatra
Maharashtra Lok Sabha Election : नाशिकच्या जागेवर ठाकरे गटाला उमेदवार मिळेना? महाविकास आघाडीकडे उरला हा पर्याय

राहुल गांधी धारावीत काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी धारावीच्या सभेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 'गेल्या ६० दिवसांपासून मी भाषण देत आहे. आपण शांत व्हा,गेल्यावर कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा काढली. देशात द्वेषाचं राजकारण होत आहे. पोलिसांनी कोणाला धक्का देऊ नये ही मोदींची रॅली नाही. आम्ही दुसरी यात्रा मणिपूरपासून सुरू केली. ही यात्रा मुंबईत नाही तर धारावीत समाप्त करत आहोत'.

Bharat Jodo Nyay Yatra
4 State Assembly Election : लोकभेसोबतच निवडणुका अन् ४ जून रोजीच निकाल; चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं

उद्याच्या काँग्रेसच्या सभेला उपस्थित राहणारे नेते

सोनिया गांधी

शरद पवार

उद्धव ठाकरे

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव

अखिलेश यादव

फारूक अब्दुल्ला

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी

आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी

डाव्या पक्षांचे प्रतिनिधी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com