Pune: मावळच्या देहूरोडमधील नागरिकांचे भिक मांगो आंदोलन

Pune: भिकेतून जमा झालेली रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करणार असल्याचं आंदोलक धर्मा तंतरपाळे यांनी महापालिकेला सांगितलं आहे.
Pune: मावळच्या देहूरोडमधील नागरिकांचे भिक मांगो आंदोलन
Pune: मावळच्या देहूरोडमधील नागरिकांचे भिक मांगो आंदोलनदिलीप कांबळे
Published On

मावळ: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील नागरिकांवर भीक मांगो आंदोलन करण्याची वेळ आली आहे. मावळ मधील देहूरोड हे 1997 साली पालिकेत समाविष्ठ झाले आहे, मात्र देहूरोडचा कोणताही विकास झाला नाही. त्यामुळे आज नागरिकांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. (Pune: Begging agitation of citizens in Dehu Road, Maval)

हे देखील पहा -

आत्ता आपल्या गावचा विकास होईल, उद्या विकास होईल या आशेवर नागरिक जगत आहेत. मात्र पंचवीस वर्षाचा कालावधी होऊनही महिलांसाठी साधं स्वछतागृह यांना बांधता आले नाही. जेष्ठ नागरिकांना विरुंगळा केंद्र तर सोडाच, परंतु मुलांना खेळण्यासाठी साधं मैदान नाहीये. लोकप्रतिनिधी आले मात्र त्यांनी स्वतःचेच कल्याण करून घेतले. आजही येथील नागरिक या सर्व सुख-सुविधांनपासून वंचित राहिले आहेत.

Pune: मावळच्या देहूरोडमधील नागरिकांचे भिक मांगो आंदोलन
बसस्‍थानकाच्‍या फलाटावर खासगी ट्रॅव्‍हल

दरम्यान आज नागरिकांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. भिकेतून जमा झालेली रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करून, देहूरोड परिसरात महिलांना स्वच्छता गृह, विरुंगळा केंद्र आणि खेळाचे मैदान उभारणार असल्याचं आंदोलक धर्मा तंतरपाळे यांनी महापालिकेला सांगितलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com