

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या आवारात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असते. अर्थात लालपरीला फायदा व्हावा; या दृष्टीने हा नियम लागू केला आहे. मात्र आता चक्क पोलिस बंदोबस्तात बसस्थानकातील फलाटावरील लालपरीची जागा खासगी ट्रॅव्हल्सने घेतली आहे. यामुळे प्रवाशांची सोय होवू लागली आहे. (jalgaon-news-Private-travel-bus-on-the-bus-stop-platform)
एसटीचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करावे; या प्रमुख मागणीसह अन्य मागणीसाठी राज्यात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एसटीचे चाके थांबली आहेत. जळगाव जिल्ह्यात पाच हजार दैनंदिन फेऱ्या रद्द होत आहेत. ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. दरम्यान, गृह विभाग (परिवहन) यांनी अधिसूचना काढून मोटार वाहन अधिनियमातील कलमानुसार खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस आदी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. या आदेशानुसार आज जळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या फलाटावरून खासगी ट्रॅव्हल्स सोडल्या जात आहेत. पोलिस बंदोबस्तात ही प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दूरवरच्या प्रवासासाठी बसेसही दाखल झाल्या आहेत.
प्रमुख मार्गावर सोडणार ट्रॅव्हल्स
आजपासून बसस्थानकातून खासगी गाड्यांमधून प्रवाशी वाहतुक केली जात आहे. यानुसार जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. प्रमुख मार्गावर या गाड्या उपलब्ध होतील त्याप्रमाणे सुरू केल्या जातील. एसटीच्या तिकिटाप्रमाणे यांना दर आकारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शिवाय खासगी गाड्या अडवल्या जाऊ नयेत म्हणून पोलिस बंदोबस्तात या गाड्या रवाना केल्या जात आहेत.
प्रवेशद्वाराजवळ रिक्षा, कालिपीली
महामंडळातील कर्मचारी संपावर असल्याने प्रवाशी वाहतुक बंदच आहे. तरी देखील अनेक प्रवाशी बसस्थानक आवाराजवळ येत असतात. अशा प्रवाशांना नेण्यासाठी स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षा व कालिपीली लावल्या जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.