Ladki bahin yojana : CM भाऊ तुम्ही पाठवलेले पैसे बँकांनी कापले; लाडक्या बहिणी रडल्या, मुख्यमंत्र्यांना घातली भावनिक साद, VIDEO

ladki bahin yojana update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले पैसे बँकांना कापता येणार नाही,असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले असताना देखील पुण्यात अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे बँकेने कापल्याचे समोर आले आहे.
CM Shinde
CM Eknath ShindeSaam Digital
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : राज्यातील सर्वच बँकेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची झुंबड पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर महिलांची बँक खात्यातून पैसे काढण्याची लगबग सुरु आहे. या योजनेचा हप्ता मिळाल्याचा आनंद साजरा करताना काही महिलांच्या बँक खात्यातील पैसे बँकांनी कापण्यास सुरुवात केली आहे. बँकांनी खात्यात किमान शिल्लक रक्कम नसल्याचं कारण देत पैसे कापले आहे. बँकांनी खात्यातील पैसे कापल्याने लाडक्या बहिणींच्या डोळ्यात पाणी आलं आहे. या प्रकरणात बँकानी थेट राज्य सरकारच्या सूचना पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळूनही सर्व बँकेने काही महिलांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. या योजनेसंबंधित सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी बहिणींचे खात्यातील पैसे कापले आहेत. सरकारने सूचनेनंतही बँकांनी लाभार्थी महिलांच्या खात्यातील पैसे कापले आहेत.

CM Shinde
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बायको'साठी सरकारला फसवलं, ३० अर्ज भरले, कसं फुटलं बिंग? पाहा व्हिडिओ

सरकारने बहिणींच्या खात्यात पैसे टाकले. त्यानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या काही लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा आली. काही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कापले आहेत. बँकांनी बहिणींना वेगळंच उत्तर दिलं. 'तुमचे खाते बंद आहे, त्यामुळे पैसे कापल्याचे बँकांनी सांगितले. खात्यातील पैसे कापल्याने अनेक बहिणींची निराशा झाली. खात्यातील पैसे न कापण्याच्या सूचना महिला आणि बाल विकास विभागाकडून बँकांना दिल्या होत्या. त्यानंतर बँकांनी पैसे कापले होते.

सरकारकडून सूचना असतानाही लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत, अशा सूचना असतानाही बँकांनी कापल्याने बहिणींच्या डोळ्यात पाणी आलं.

CM Shinde
Sanjay Raut : लाडक्या उद्योगपतीकडून मुंबईत छत्रपतीच्या पुतळ्याची विटंबना, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

यावेळी लता सोनवणे म्हणाल्या की, मी बँकेकडून कर्ज घेतलेलं होतं. माझ्या खात्यात पैसे आले. मी पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी बँकेने मला पैसे मिळणार नाही, असे सांगितलं. तुमचे पैसे कर्जामध्ये कापले गेले, असं सांगितलं. भावाने पाठवलेल्या पैशांवर बँकांचा अधिकार नाही, त्याच्यावर माझाच अधिकार आहे, असं त्यांना सांगितलं. तरीही त्यांनी माझे पैसे कापले. मी बँकेचे नियमित कर्ज भरते, तरी माझे पैसे का कापले, मला माझे पैसे परत मिळावेत, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करत आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com