- सचिन बनसाेडे
Balasaheb Thorat News : नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात असा राजकीय सामना रंगणार आहे. यावेळी कारण आहे बाजार समित्यांच्या निवडणूकांचे. गेल्या १५ वर्षांपासून विखे पाटलांचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या शिर्डी मतदारसंघातील राहाता बाजार समितीची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) केला आहे. (Maharashtra News)
विखेंच्या मतदारसंघात महाविकास आघाडीची (mva) मोट बांधत बाळासाहेब थोरात यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. २००९ सालच्या विधानसभेला त्यांचा कार्यक्रम करायला पाहिजे होता अशी कार्यकर्त्यांची खंत आहे. मात्र त्यावेळी आम्ही एकाच पक्षात (काँग्रेस) असल्याने एकनिष्ठता दाखवली. आता मार्ग मोकळा झाला असून अडचण नाही असे म्हणत बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांना डिवचल आहे.
या मतदारसंघात जिरवाजिरविचा कार्यक्रम मोठा आहे. मात्र तुम्ही घाबरायचे सोडून द्या. शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उडवण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे असेही बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबाेधित करताना आवाहन केले.
गेल्या काही महिन्यांपासून राधाकृष्ण विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करत असून विविध माध्यमातून त्यांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे थोरातांनी देखील राहाता बाजार समितीच्या माध्यमातून विखे पाटलांवर पलटवार केल्याचं बोललं जात आहे.
राधाकृष्ण विखे पाटील आता थोरातांना कशा पद्धतीने उत्तर देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात असा राजकीय सामना रंगणार असल्याचं चित्र आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.