Laundry Price Hike : इस्त्रीच्या कपड्यांनाही महागाईचा शॉक, ड्रायक्लिनिंग आणि धुलाईच्या किंमतीतही वाढ

Laundry price hike in Badlapur: इस्त्रीच्या कपड्यांनाही महागाईचा शॉक बसला आहे. ड्रायक्लिनिंग आणि धुलाईच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. कुळगांव बदलापूर लाँन्ड्री चालक-मालक असोसिएशनचा निर्णय
badlapur-laundry-prices-hike
badlapur-laundry-prices-hike
Published On

मयुरेश कडव, बदलापूर प्रतिनिधी

Badlapur Laundry Prices Hike : खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सिलेंडरचे भाव आणि इतर सर्व वस्तूंच्या किंमती वाढत असचानाच आता इस्त्रीच्या कपड्यांनाही महागाईचा शॉक बसणार आहे. आता कडक इस्त्री करून कपडे घालण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागणार आहेत. कारण कुळगांव बदलापूर लाँन्ड्री चालक-मालक वेल्फेअर असोसिएशननं प्रत्येक कपड्यामागे 1 रुपयांनी दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय आहे. गुरीवारपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

बदलापूर शहरात यापूर्वी एका शर्टसाठी किंवा पॅन्टसाठी 7 रुपये दर आकारला जात होता. मात्र आता भाववाढीनंतर ग्राहकांना एका शर्ट किंवा पॅन्टच्या इस्त्रीसाठी 8 रुपये मोजावे लागणार आहेत. विजेच्या दरात झालेली वाढ आणि जीवनावश्यक वस्तू महागल्यानं लॉंन्ड्रीचं काम करणाऱ्या कामगारांचे पगारही वाढले आहेत. त्यामुळे हा दरवाढीचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती बदलापुरातील शिरगांव परिसरातील लॉंन्ड्री चालक दिनेश कनौजिया यांनी दिलीय.

badlapur-laundry-prices-hike
ST Employee : अर्थ खात्याकडे भीक मागत नाही, ७ तारखेला ST कर्मचाऱ्याचा पगार व्हावा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कपड्यांच्या इस्त्रीसह ड्रेसच्या धुलाईसाठी यापूर्वी 120 रुपये आकारले जात होते. ते आता 160 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. तसच ड्रायक्लिनिंग आणि इतर सुविधांच्या दरातही वाढ करण्यात आली असल्याचं लॉन्ड्री चालकांनी सांगितलय. कुळगांव बदलापूर लॉंन्ड्री चालक-मालक वेल्फेअर असोसिएशनने यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये दर वाढवले होते. तेव्हाही 1 रुपयानं ही दरवाढ करण्यात आली होती.

badlapur-laundry-prices-hike
Maharashtra Politics : रायगडचा तोडगा निघणार, एकनाथ शिंदेंची नाराजी दूर होणार? अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

गेल्या तीन वर्षांपासून कपड्यांच्या इस्त्रीचा दर हा प्रति शर्ट किंवा पॅन्ट 7 रुपये इतका होता. मात्र 3 वर्षानंतर वाढलेली महागाई आणि इतर सर्व बाबींचा विचार करून तसेच ग्राहकांचाही विचार करून फक्त एकच रुपया दरवाढ करण्यात आल्याचं लॉन्ड्री चालक सांगत आहेत. बदलापूर शहरात जवळपास 300 लॉन्ड्रीची दुकानं आहेत. या सर्वच दुकानांमध्ये इस्त्रीचे दर वाढणार आहेत. त्यामुळे कडक कपडे घालण्यासाठी ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com