
amit shah maharashtra visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एक दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे, याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये एकना शिंदे यांची नाराजी दूर होऊ शकते, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये सध्या तिढा आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिंदेंनी दावा ठोकलाय, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून आग्रह धरला जातोय. अमित शाह यांच्या या दौऱ्यामध्ये पालकमंत्री पदाच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या दौऱ्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील समन्वय आणि मतभेद दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी असल्याचं बोलले जातेय. तशा बातम्याही समोर आल्या. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपली नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली आहे. भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकलाय. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अमित शाह रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यात यावर चर्चा होऊन हा वाद संपुष्टात येईल, अशी राजकीय चर्चा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संभाव्य दौरा :
12 एप्रिल 2025, सकाळी 10 वाजता, पुणे विमानतळावर आगमन
10. 45 वाजता: पाचाडमध्ये हेलीकॉप्टरने लँडिंग
11. 00 ते 1:00 वाजेपर्यंत : रायगड किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थिती
1. 30 वाजता: पाचाडवरून टेक ऑफ
2. 00 वाजता: सुतारवाडीमध्ये सुनील तटकरे यांच्या घरी भोजन
3. 00 वाजता: मुंबईसाठी रवाना
4. 00 ते 6. 00 वाजेपर्यंत : विलेपार्लेमध्ये चित्रलेखा साप्ताहिकच्या कार्यक्रमात सहभागी
सह्याद्री अतिथी गृहामध्ये मुक्काम
13 एप्रिल 2025 : दिल्लीसाठी रवाना
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरीचा आढावाही घेतला जाणार आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील एकजूट आणि प्रभावी समन्वय यावर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्याचे नेमके वेळापत्रक आणि कार्यक्रम याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. मात्र, हा दौरा महायुती सरकारसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.