Badlapur News: नदीत पोहण्याचा मोह आला जिवाशी; एकमेकांना वाचवण्यात तीन जण बुडाले

3 Youth Drowing Barvi River: तिघांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे बदलापूरमध्ये हे तरुण ज्याठिकाणी राहत होते त्या परिसरात शोककळा पसरली आहे.
Badapur Barvi River
3 Youth Drowing Barvi RiverSaam Tv

अजय दुधाणे, बदलापूर

बदलापूरजवळच्या (Badlapur) बारवी नदीमध्ये (Barvi River) बुडून ३ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकामेकांना वाचवण्याच्या प्रयत्नांमध्ये तिघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. तिघांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे बदलापूरमध्ये हे तरुण ज्याठिकाणी राहत होते त्या परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरजवळील आसनोली गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीत पोहण्यासाठी ३ मित्र गेले होते. बुधवारी दुपारी तिघेही ठरल्याप्रमाणे नदीवर गेले. नदीमध्ये पोहण्यासाठी ते उतरले खरे पण परत बाहेर आलेच नाही. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक मित्र बुडू लागला म्हणून त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र गेला. दोघांनाही बुडताना पाहून तिसरा त्यांना वाचवण्यासाठी गेला. पण एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही नदीमध्ये बुडाले.

Badapur Barvi River
Traffic Jam In Pune: सुट्ट्यांमुळे वर्दळ वाढली, वाहनांच्या संख्येत वाढ; पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

नदीमध्ये बुडून तिन्ही मित्रांचा मृत्यू झाला. हृतिकेश मुरगु (23 वर्षे), सुहास कांबळे (19 वर्षे) आणि युवराज हुली (18 वर्षे) अशी या तिन्ही मित्रांची नावं आहेत. हे सर्व तरुण बदलापूरनजीकच्या घाडगेनगर आणि जावसई परिसरामध्ये राहणारे आहेत. तिघांनाही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे घाडगेनगर आणि जावसई परिसरात शोककळा पसरली आहे. तसंच, या तिन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Badapur Barvi River
Mumbai-Pune Highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसने पती-पत्नीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com