Badlapur Case: शाळेतील १५ दिवसांचे CCTV फुटेज गायब, शाळेच्या मॅनेजमेंटवर कारवाई होणार

Deepak Kesarkar On Badlapur Case: बदलापूरच्या त्या शाळेमध्ये १५ दिवसाचं सीसीटिव्ही रेकॉर्डिंग का गायब आहे? याची चौकशी पोलिसांनी करावी असे केसरकरांनी सांगितले.
Badlapur Case: शाळेतील १५ दिवसांचे CCTV फुटेज गायब, शाळेच्या मॅनेजमेंटवर कारवाई होणार
Deepak Kesarkar On Badlapur Case Saam Digital
Published On

बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी तपासाबाबत महत्वाची माहिती सांगितली. बदलापूरच्या त्या शाळेमध्ये १५ दिवसाचं सीसीटिव्ही रेकॉर्डिंग का गायब आहे? याची चौकशी पोलिसांनी करावी असे केसरकरांनी सांगितले. तसंच, शाळेच्या मॅनेजमेंटला जर सर्व माहिती असेल आणि त्यांचा या प्रकरणात सहभाग असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की, 'शाळेत जो प्रकार घडला त्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी उपस्थित होते. आम्ही अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला. घटना घडलेल्या शाळेमध्ये दोन सेविका होत्या. कामिनी वायकर, निर्मला भुरे या सेविका ज्या लहान मुलांना वॉशरुमला जायचे असल्यास त्यांना घेऊन जायच्या. या दोन्ही महिला चौकशीवेळी अनुपस्थित होत्या. त्यांची चौकशी ही गृहखात्याकडून होईल. सगळ्या मोठी चूक या दोन महिलांची आहे. त्या जर तिकडे असत्या तर हे प्रकरण घडलं नसतं. हे सगळ पाहता त्यांना सहआरोपी करावं.'

दीपक केसरकर यांनी सांगितले की, 'क्लास टीचर यांनी पोलिसांना सांगितले नाही. तसेच प्रिन्सिपल यांनी ही सांगितले नाही. त्यामुळे दोघांवर पोक्सोअंतर्गत कारवाई करावी ही शिफारस आम्ही गृहखात्याला करत आहोत. १६ तारखेला प्राईव्हेट हॉस्पिटलमध्ये मुलीला घेऊन गेल्यानंतर हे प्रकरण समजले. पण रात्री गुन्हा दाखल झाला. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. मॅनेजमेंटला माहीत होतं आणि त्यांचा जर यात काही सहभाग असेल तर त्यांच्यावर पण कारवाई होईल. १५ दिवसाचं सीसीटिव्ही रेकॉर्डिंग का गायब आहे? याची चौकशी पोलिसांनी करावी. याप्रकरणाचा पुढील सर्व तपास गृहखाते करेल.'

तसंच, 'मुलीच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी मी घेतली आहे. आम्ही फक्त काही मुद्दे समोर आणतोय. आम्ही यात चौकशी करु शकत नाही. पोलिस चौकशी करणार आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमली आहे. १५ दिवसाचं सीसीटिव्ही फुटेज गायब आहे. वॉशरुमजवळचं सीसीटिव्ही गायब आहे. शाळेच्या मॅनेजमेंटला सगळं माहिती असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल.'असे देखील केसरकर यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com