Badalapur News: लसीकरणानंतर इंजेक्शनची सुई राहिली चिमुकलीच्या मांडीत, ५ महिन्यांनंतर जे घडलं ते जाणून उडेल थरकाप

Injection Needle Left In Childs Thigh: या प्रकरणी इंजेक्शन देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी चिमुकलीच्या आई-वडिलांनी केली आहे.
Injection Needle Left In Childs Thigh
Injection Needle Left In Childs ThighSaam Tv
Published On: 

अजय दुधाणे, बदलापूर

Badlapur News: लसीकरण (Vaccination) केल्यानंतर इंजेक्शनची सुई चिमुकलीच्या मांडीतच राहिल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आलाय. नवव्या महिन्यात लसीकरण केल्यानंतर तब्बल पाच महिने इंजेक्शनची सुई चिमुकलीच्या मांडीतच अडकून होती. या प्रकरणी इंजेक्शन देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी चिमुकलीच्या आई-वडिलांनी केली आहे.

Injection Needle Left In Childs Thigh
Kalyan News: कल्याणमध्ये भाजप-शिवसेना पुन्हा समोरासमोर, भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या नेत्यामध्ये हमरीतुमरी; काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये राहणारे विशाल बनसोडे यांनी मुलगी अद्विकाचं नवव्या महिन्यातील लसीकरण बदलापूरच्या दुबे रुग्णालयात केलं होतं. लसीकरण झाल्यानंतर काही दिवस तिच्या मांडीवर सूज होती. सूज उतरल्यानंतर पुढील पाच महिने अद्विकाला कोणताही त्रास झाला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी ती सतत मांडी खाजवत असल्याचं बनसोडे दाम्पत्यांच्या लक्षात आलं.

Injection Needle Left In Childs Thigh
Nagpur Airport: टेक ऑफपूर्वीच पायलटचा मृत्यू, नागपूर एअरपोर्टवरील घटना; नेमकं काय घडलं?

मुलीला त्रास होत असल्याने त्यांनी तिला अंबरनाथच्या आशीर्वाद रुग्णालयात नेलं. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर मनोज कंदोई यांनी तिच्या मांडीचा एक्सरे केल्यानंतर मांडीत इंजेक्शनची सुई असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर तिचं ऑपरेशन करून मांडीतील सुई काढण्यात आली.

Injection Needle Left In Childs Thigh
Beed Sharad Pawar: 'फोटो लावण्याशिवाय पर्याय नाही, तुमच्यात हिंमत नाही का?', शरद पवारांच्या फोटोंवरुन राजकारण तापलं

ऑपरेशन केल्यानंतर अद्विकाच्या मांडीवर तीन टाके पडलेत. अद्विकाच्या मांडीतली सुई काढण्यात आली आहे. तब्बल पाच महिने इंजेक्शनची सुई अद्विकाच्या मांडीत होती. आता ऑपरेशन झाल्यानंतर तिला कोणताही धोका नसला तरी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दुबे रुग्णालयातील संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बनसोडे दाम्पत्यांनी केली आहे. तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल. जर कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असं दुबे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश अंकुश यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.