Kalyan News: कल्याणमध्ये भाजप-शिवसेना पुन्हा समोरासमोर, भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या नेत्यामध्ये हमरीतुमरी; काय आहे प्रकरण?

Shiv Sena Vs Bjp in Kalyan: कल्याणमध्ये भाजप-शिवसेना पुन्हा समोरासमोर, BJP आमदार आणि शिंदे गटाच्या नेत्यामध्ये हमरीतुमरी; काय आहे प्रकरण?
Kalyan News BJP Shivsena
Kalyan News BJP ShivsenaSaam tv
Published On

>> अभिजित देखमुख

Shiv Sena Vs Bjp in Kalyan: कल्याण पूर्व येथील भाजप व शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमधील वाद आता विकोपाला गेला आहे. बुधवारी रात्री व्हॉट्सअपचा एका ग्रुपवर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात हमरीतुमरी झाली. दोघांनी एकमेकांवर दोघांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनीही दोघांना जनतेसमोर येण्याचा आव्हान केलं. आज दोघे कल्याण पूर्वेकडील महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात जमणार होते. भाजपा आमदार गणपत गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पोहोचले. भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याच ठिकाणी येण्यास निघालेले शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना तिसगाव नाक्याजवळच पोलिसांनी रोखलं व ताब्यात घेतले.

Kalyan News BJP Shivsena
Petrol Diesel Price News: पेट्रोल-डिझेलचे कमी होणार दर? मोदी सरकार घेऊ शकते मोठा निर्णय, वाचा...

शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कल्याण पूर्व येथील युतीमधील वाद आता विकोपाला गेले असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान, युतीमधील सुरू असलेले वाद आता विकोपाला गेलाच दिसून आलं. या घटनेमुळे कल्याण पूर्व येथील राजकीय वातावरण तापले होते. शिवसेना शहरप्रमुख भाजप आमदारांना मधील वाद थांबवण्याचा आवाहन आता शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर उभा ठाकले आहेत. (Latest Marathi News)

पोलिसांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पुन्हा आरोप केले. तर महेश गायकवाड शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी देखील आमदार गणपत गायकवाड यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

Kalyan News BJP Shivsena
Fixed Deposit Scheme: एफडीवर ही बँक देत आहे सर्वाधिक 9.10 टक्के व्याज, इतक्या दिवसांची करावी लागेल गुंतवणूक...

काय म्हणाले भाजपा आमदार गणपत गायकवाड?

माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत असाल तर माझी लाईव्ह नार्को टेस्ट करा कळेल कोणी भ्रष्टाचार केला. इतकी वर्ष महापालिकेत सत्ता असून रिझर्वेशनचा भूखंड ताब्यात घेतला नाही. आरक्षित भूखंडावर यांनी अनधिकृत बांधकाम केली आणि हे दुसऱ्यांवर आरोप करतात. वरिष्ठ नेत्यांचा यामध्ये वरदहस्त असेल एकत्र सत्ता असल्यानंतर एक दुसऱ्यांच्या विरोधात बोलत नाही. मात्र त्यांना गद्दारी करायची असेल म्हणून ते असं करत असतील, 2019 ला कोणी गद्दारी केली. मी तर प्रामाणिकपणे काम केलं इथून पुढे प्रामाणिकपणे काम करतात. मी भाजपचा कार्यकर्ता आहे जे भाजपा सांगेल ते काम मी प्रामाणिकपणे करेल. याबाबत आधी देखील मी खासदार श्रीकांत शिंदे यांना दोनदा तीनदा सांगितलं होतं त्यांनी याची दखल घेतली पाहिजे होती, अशी खंत व्यक्त केली. मी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांसोबत राहील पण गद्दारांसोबत राहणार नाही, असा टोला शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना लगावला.

काय म्हणाले शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड?

"सामान्य माणसाने गणपत गायकवाड यांना कल्याण पूर्वेत विकासासाठी काय काम केलं असा प्रश्न केला. त्यानंतर आमदाराने तुमच्यामध्ये दम असेल तर माझा समोरून विचारा अशी प्रतिक्रिया दिली. म्हणून मी तर नागरिकांच्या वतीने पुढाकार घेण्याचं काम केलं. मात्र पोलिसांनी दडपशाही केली. सामान्य माणसांना बोलण्याचा अधिकार आहे त्याला दाबण्याचे काम आमदारांच्या माध्यमातून सुरू आहे. ते मला गद्दार म्हणतात पण त्यांनी तीन टर्ममध्ये दोन पक्ष बदलले त्यामुळे गद्दार कोण हे जनता ठरवेल. आमदार गणपत गायकवाड नेहमीच मतदार संघात अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे मी विकास करू शकलो नाही, असं सांगतात. मात्र प्रत्यक्षात तीन टर्म असलेले आमदार त्यांच्या कार्यकाळातील अनधिकृत बांधकाम झाली. तेव्हा आमदार कुठे होते याचा सवाल महेश गायकवाड यांनी उपस्थित केला. येत्या काळात विकासाचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचा जाहीर करण्याचं काम मी करणार आहे. वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट कळली का? याची मला कल्पना नाही. मात्र आपल्या माध्यमातून वरिष्ठना एवढेच सांगेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही काम करतोय,आम्ही युतीचा धर्म पाळतोय. मात्र कल्याण पूर्वेत जर शिवसैनिकाला दाबण्याचं काम होत असेल तर आम्ही कदापी सहन करणार नाही. येणाऱ्या काळात ज्या ज्या ठिकाणी विकास होत नसेल, त्या ठिकाणी जाब विचारण्याचं काम करू.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com