उद्धव ठाकरे यांच्यावर गिरगावच्या रिलायन्स रूग्णालयात अँजिओप्लास्टी पार पडलीय. यापूर्वी २०१२ मध्ये लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाकरेंना ऍडमिट व्हावं लागलंय. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. पाहूया एक रिपोर्ट.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. सगळेच पक्ष जागावाटप आणि निवडणुकीच्या रणनितीमध्ये व्यस्त आहेत. शनिवारी दसरा मेळाव्यातून विरोधकांवर हल्लाबोल करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. कारण ठाकरेंवर मुंबईतल्या रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आलेली आहे.
मंगळवारी सकाळी उद्धव ठाकरे गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळून आले. वैद्यकीय सल्ल्यानुसार ठाकरेंवर त्वरीत अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
आज सकाळी, उद्धव ठाकरे यांनी सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपशीलवार तपासणी केली. तुमच्या शुभेच्छांसह, सर्व काही ठीक आहे. आणि ते कामावर उतरण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे तयार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर यापूर्वी वैद्यकीय उपचार झाले आहेत.
16 जुलै 2012 रोजी उद्धव ठाकरे यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी स्वत: गाडी चालवत उद्धव यांना मातोश्रीवर आणले होते. त्यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी, एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर फिजिओथेरेपी सुरू करण्यात आली. या दुखण्यातून सावरण्यासाठी त्यांना अनेक आठवडे लागले होते. यावेळी ते मुख्यमंत्री होते. या शस्त्रक्रियेबाबत जनतेशी संवाद साधताना त्यांनी माहिती दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.