Andheri Crime News: अवघ्या ३ तासांत चोराला शोधून ठोकल्या बेड्या, अंधेरी पोलिसांची जबरदस्त कामगिरी

Andheri Police: सध्या आरोपी अंधेरी पोलिसांच्या (Andheri Police) ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
Andheri Police
Andheri Police Saam Tv
Published On: 

संजय गडदे, मुंबई

Mumbai News: मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील (Andheri East) पुरुषोत्तम विल्ला या घरातून रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. यासंदर्भात फिर्यादी केशव मुदलियार त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून अंधेरी पोलिसांनी आरोपीला अवघ्या तीन तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोरी गेलेले दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली असून सध्या आरोपी अंधेरी पोलिसांच्या (Andheri Police) ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यामुळे फिर्यादी यांनी अंधेरी पोलीस पथकाचे आभार मानले.

Andheri Police
Supriya Sule On Ajit Pawar: 'अजित पवार आमच्या पक्षाचे नेते, राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट नाही', सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पूर्वेकडील पुरुषोत्तम विल्ला या ठिकाणी अज्ञाताने घरात घुसून घरातील किमती दागिने आणि रोख रक्कम चोरी करून पळ काढला. या संदर्भात फिर्यादी यांनी विलंब न करता अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिवसांनी गुन्हा दाखल करून घटनेचे गांभीर्य ओळखल तात्काळ तपास पथक नेमणूक घटनास्थळाच्या आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून आरोपीची ओळख पटवून आरोपीस अवघ्या तीन तासांतच अटक केली.

Andheri Police
Ramdas Athawale News: रामदास आठवले यांच्यामुळे शिंदे गटाचं वाढलं टेन्शन, शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी युतीत रस्सीखेच

पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे फिर्यादीस आपले दागिने व रोख रक्कम परत मिळाल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर खुश होत शाखाप्रमुख. विनोद चौधरी, केशव मुदलियार,उमेश मेस्त्री यांच्या उपस्थितीत विभागातील नागरिकांच्या वतीने अंधेरी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अभिनंदनपर सत्कार करून आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com