लोकसभा निवडणुच्या पार्श्वभूमीवर असे मोजकेच उमेदवार आहेत की ज्यांची उमेदवारी नावं यादी जाहीर होण्याआधीच फिक्स झाली आहे. यामध्ये शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे आहेत.
अमोल कोल्हे यांनी लोकसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवारचं ठरत नाही, अशी स्थिती आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिरुरच्या जागेवर महायुतीकडून अजित पवार गटाचा दावा कायम आहे. तर उमेदवार अदलाबदल करण्यासाठी अजित पवार गटात विरोध आहे. शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याची चर्चा होती.
शिवाजी आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसमधून विरोध होत आहे. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. तर विलाश लांडे यांनी अजित पवार गटातून लढण्यासाठी मुंबईत फिल्डिंग लावली आहे.
तर आढळराव पाटील यांनीही मुंबईत तळ ठोकला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार? याकडे नागरिकांच्या नजरा आहे.
महायुतीमध्ये अद्याप जागावाटपाबाबत एकमत होताना दिसत नाही. भाजप ३४, शिवसेना १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा असा प्रस्ताव भाजपने समोर ठेवल्याचं कळतंय. विनिंग फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.