जुन्नर : बैलगाडा शर्यतीची (bullock cart race) भिर्रर्र झाली आणि गावगाड्यावरचे अर्थकारण चांगल्या पटलावर आलं. गाव जत्रा यांना सुगीचे दिवस आले. आता हा बैलगाडा शर्यतीचा नाद जगाच्या (world) पटलावर घेऊन जाणार असल्याचे खासदार अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी स्पष्ट केले आहे. (amol kolhe latest marathi news)
खासदार अमोल कोल्हे जुन्नर (junnar) हे परिसराच्या दाै-यावर आले हाेते. त्यावेळी एका कार्यक्रमात बाेलताना ते म्हणाले शास्वत विकास कसा साधता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशिल असताे. बैलगाडा शर्यत, छकडा शर्यत या साहसी खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ. त्यामुळे शिरुर मतदारसंघात पर्यटक शर्यती पाहण्यासाठी येतील.
जसे मैसूर येथे भरणारा हत्ती महोत्सव, कच्छ येथे भरणारा उंट महोत्सव याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर बैलगाडा शर्यत महोत्सव महाराष्ट्रात सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक महाराष्ट्रात येऊन आपली बैलगाडा शर्यत पाहतील आणि जगभरात घेऊन जातील असा विश्वास खासदार कोल्हेंनी व्यक्त केला.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.