अमित शाह पुणे दौऱ्यावर पण मुरलीधर मोहोळांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित, राष्ट्रवादीला झुकते माप?

Amit Shah Pune Visit Ncp Gets Priority Over Bjp: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप मिळणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण, भाजपच्या मॅरेथॉन कार्यक्रमाला अनुपस्थिती आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
AMIT SHAH PUNE VISIT
AMIT SHAH PUNE VISITsaam tv
Published On: 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आगामी पुणे दौऱ्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना अधिक महत्त्व मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉनच्या उद्घाटनाला शहा उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, पुणे जिल्हा परिषदेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात काहीशी निराशा, तर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.अमित शहा १५ आणि १६ नोव्हेंबर असे दोन दिवस पुणे दौऱ्यावर येत आहेत.

AMIT SHAH PUNE VISIT
मोठी बातमी! सुनेत्रा पवार अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण!

या दौऱ्यात पुणे शहरात त्यांचा कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम नियोजित नाही. मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी शहा येणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार शहरात होर्डिंग्जच्या माध्यमातून जाहीरातही करण्यात आली होती. मात्र, शहा रविवारी दुपारी पुण्यात दाखल होणार असल्याने मॅरेथॉनच्या उद्घाटनाला त्यांची उपस्थिती राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे.

AMIT SHAH PUNE VISIT
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी दिल्लीत मोर्चेबांधणी? सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये 35 मिनिटे चर्चा

या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. खासदार पार्थ पवार यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेला भेट देत कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा पुणे दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

AMIT SHAH PUNE VISIT
कोर्टाच्या निकालाआधी ठाकरे- शिंदेंमध्ये मनोमिलन होणार? राजकारणात खळबळ

विशेष म्हणजे, रविवारी संध्याकाळपासून सोमवार सकाळपर्यंत शहा यांचा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही. या मोकळ्या वेळेत महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत राजकीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादीला मिळणारे महत्त्व आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.