अंबरनाथमध्ये बिस्किट कंपनीमध्ये ३ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आनंदनगर एमआयडीसीतील राधेकृष्ण बेकर्स कंपनीत ही दुर्घटना घडली आहे. बिस्कीट तयार करणाऱ्या मशीनमध्ये अडकून या मुलाचा मृत्यू झाला. आयुष चौहान असं या मुलाचे नाव होतं. हा चिमुकला आपल्या आईसोबत कंपनीमध्ये आला होता. त्यावेळी तो मशीनजवळ गेला असता त्याचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ एमआयडीसीत राधेकृष्ण बेकर्स नावाची बिस्कीट कंपनी आहे. या कंपनीत पूजा चौहान ही महिला बिहार राज्यातून काही दिवसांपूर्वीच काम करण्यासाठी आली होती. तिचा ३ वर्षांचा मुलगा आयुष याचा सांभाळ करायला घरी कुणी नसल्यानं ती त्याला कामावर आपल्या सोबत घेऊन येत होती. आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पूजा कंपनीत काम करत होती.
पूजा चौहानचा मुलगा आयुष हा बिस्कीट तयार करणाऱ्या मशीनजवळ गेला आणि बेल्टमध्ये अडकला. मशीनमध्ये अडकून आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयुषचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेनं पूजा चौहान यांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर बिस्कीट कंपनीमध्ये खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.