अंबरनाथ - शहरातील मोरीवली डम्पिंग ग्राउंडवर Dumping Ground अज्ञातांनी लॉलीपॉप Lollipop टाकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता अंबरनाथ नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून हे लॉलीपॉप टाकणाऱ्या कंपनीला ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अंबरनाथच्या Ambernathमोरीवली पाड्याजवळील बंद डम्पिंग ग्राउंडवर दोन दिवसांपासून लॉलीपॉपच्या गोण्या आणून टाकण्यात आल्या होत्या.
हे देखील पहा -
त्यामुळे डम्पिंग ग्राउंडवर लॉलीपॉपचा अक्षरशः खच पडल्याचे पाहायला मिळाले होते. हे लॉलीपॉप घेण्यासाठी कचरा वेचक मुलांनीही गर्दी केली होती. मात्र हे लॉलीपॉप इथं कुणी टाकले, आणि ते एक्सपायरी डेट झालेले असतील तर त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रश्न यानंतर उपस्थित झाले.
याप्रकारणी अंबरनाथ पालिकेनं लॉलीपॉप टाकणाऱ्या कंपनीचा शोध घेतला असता अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील W 35 क्रमांकाच्या एसआर कन्फेक्शनरी या कंपनीने हे लॉलीपॉप टाकल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कंपनीला अंबरनाथ नगरपालिकेने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, मोरीवली डम्पिंग बंद होऊनही अजूनही अनेक कंपन्या आणि हॉटेल इथे कचरा आणून टाकत असून या सर्वांवर कारवाई करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.