

Ambernath Local Train: मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन नेहमीच खचाखच भरलेली असते. लोकल ट्रेनमध्ये जागा पकडण्यासाठी सर्वांचीच धावपळ सुरु असते. अशात अंबरनाथ रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये जागा पकडण्यासाठी काही प्रवाशी यार्डातूनच ट्रेन पकडतात. यामुळे काल या रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिस आणि प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ झाला. आज सलग दुसऱ्या दिवशी देखील रेल्वे स्थानकात परिस्थिती अशीच कायम आहे. (Latest Marathi News)
अंबरनाथमध्ये यार्डातून सुटणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांना बसण्यास रेल्वे पोलिसांनी मनाई केली. त्यामुळं सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे पोलीस आणि प्रवासी यांच्यात वाद होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील यार्डातून सकाळी ७.५१ ची सीएसएमटी फास्ट लोकल सुटते. ही लोकल स्टेशनला येण्यापूर्वी यार्डातूनच अनेक प्रवासी लोकलमध्ये बसून जागा अडवून ठेवतात. त्यामुळं प्लॅटफॉर्मवरून लोकल पकडणाऱ्यांना जागा मिळत नसल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली आहे. या तक्रारीनुसार, रेल्वे पोलिसांनी काल यार्डात जाऊन प्रवाशांना लोकलमधून उतरवलं. त्यामुळं या प्रवाशांनी १० मिनिटं लोकल अडवून ठेवली.
अंबरनाथच्या कारशेडमध्ये प्रवासी लोकलमध्ये चढत असताना रेल्वे पोलिसांनी काही प्रवाशांवर कारवाई केली. आर पी एफ पोलीस सकाळपासून ॲक्शन मोडमध्ये आहेत. कारवाई करताना रेल्वे पोलीस आणि प्रवाश्यांनमध्ये झाली झटापट. रेल्वे पोलिसांनी १५ ते २० प्रवाशांना ताब्यात घेतलं आहे. हा सर्व गोंधळ आज सकाळी 7:50 च्या लोकलमध्ये झाला.
सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कारवाई केल्यानं प्रवासी आणि रेल्वे पोलीस यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झाला आणि प्रवाशांनी (Passengers) लोकल अडवून धरली. यार्डातून सुटणाऱ्या प्रवाशांना उतरवता, मग अंबरनाथ (Ambernath) लोकलमध्ये विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर स्थानकातून उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई का करत नाही? असा सवाल या प्रवाशांनी केला. अखेर पोलिसांनी कारवाईचा इशारा देताच प्रवासी बाजूला झाले. मात्र यानंतर उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई होते का? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.