Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक आज दुपारी दोन वाजेपर्यंत बंद

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक आज दुपारी दोन वाजेपर्यंत बंद

राष्ट्रीय महामार्ग आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट येथे रस्ता रुंदीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता असल्याने पोलिस प्रशासनाच्या देखरेखीखाली ब्लास्टिंगचे काम करण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत

jalna : विशेष मोहिमेत तब्बल 209 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई,कारवाईत 6 लाख 38 हजार रुपयांचा दंड वसूल...

जालन्यात अल्पवयीन वाहन चालकांविरोधात वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत तब्बल 209 अल्पवयीन वाहन चालक आढळून आले असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 6 लाख 38 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालकांकडून अपघात होणे, चालक स्वतः जखमी होणे आणि इतरांना दुखापत होणे अशा तक्रारी वाहतूक शाखेकडे येत होत्या. त्यावरून वाहतूक शाखेने जालना शहर आणि जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून तब्बल 209 अल्पवयीन वाहन चालकांना पकडले. या कारवाईदरम्यान पालकांना समज देऊन, पालक आणि अल्पवयीन चालकांना मोटार वाहन कायद्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. या विशेष मोहिमेत तब्बल 6 लाख 38 हजार रुपयांचा दंड वाहतूक शाखेने वसूल केलाय.

तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जोरदार तयारी

तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.नवरात्र उत्सव कालावधीत देवीचा छबिना मिरवणूक वाघ ,सिंह, हत्ती घोडा, मोर, गरुड या वाहनांवर काढली जाते.त्याला रंगरंगोटी केली जात आहे.तुळजापुरातील पोतदार कुटुंबीय हे काम करत.दोन पिढ्यांपासून त्यांच्याकडून ही सेवा केली जात आहे.

जिल्ह्यातील 425 झेडपीच्या शाळेत एकही महिला शिक्षिका नाही, मुली शारीरिक व मानसिक समस्या कुणाला सांगणार?

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण हे अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मासिक पाळी शारीरिक बदल किंवा इतर वैयक्तिक समस्या यावर मुली, ह्या पुरुष शिक्षकांशी संवाद साधू शकत नाहीत, त्यामुळे अशा संवेदनशील विषयांवर महिला शिक्षिका विद्यार्थिनींना मार्गदर्शक समुपदेशन करू शकतात, मात्र लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 425 शाळेत महिला शिक्षिका नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे, मात्र महिला शिक्षिका नसल्यामुळे मुलींन पुढे ही,नवीन समस्या उभा टाकली आहे. विशेषता उदगीर आणि अहमदपूर तालुक्यातील झेडपीच्या शाळेत एकही महिला शिक्षिका नसल्याची आश्चर्यकारक माहिती देखील समोर आली आहे. जिल्ह्यातील 4 हजार 856 शिक्षकांपैकी 1हजार 684 इतकीच महिला शिक्षकांची संख्या आहे..

मुलाच्या खून प्रकरणात आई- प्रियकराराला जन्मठेपाची शिक्षा

यवतमाळच्या नेर तालुक्यातील मोझर येथे कमल चव्हाण तीन ऑगस्ट 2020 ला रात्री आठ वाजताच्या सुमारास घरातून बाहेर गेला होता तो परत घरी आला नाही दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता जावयाने नेर पोलीस ठाणे गाठून कमाल चव्हाण समशानभूमीत पडून असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी समशानभूमी गाठून पाहिणी केली असता त्याच्या गळ्यावर तसेच चेहऱ्यावर धारधारशस्त्राने हल्ला केल्याचे उघडकीस आले त्यानंतर मृताची आई यांनी नेर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्या विरोधात तक्रार दिली दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला पाच दिवसाच्या तपासानंतर प्रत्यक्षदर्शी पंकज कावरे याला संशयाच्या कारणातून पोलिसांनी विचारपूस केली. मृत्ताची आई शोभा चव्हाण आणि प्रियकर नरेंद्र ढेंगाळे या दोघांनी संगणमत करून कमल याला राहत्या घरात जीवानिशी ठार मारून गावातील समशानभूमीत नेऊन टाकल्याची कबुली पोलीस समोर आरोपींनी दिले त्यावरून पोलिसांनी दोघांनाही 10 ऑगस्ट 2020 ला अटक केली घरातील लोखंडी सराट्याने त्याला ठार मारल्याची कबुली दोन्हीही आरोपींनी पोलिसांना दिली.

Nashik News : नाशिकमध्ये आज मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र दिसणार

- मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये संयुक्त जन आक्रोश मोर्चा

- मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसेचे नेते राहणार उपस्थित

- मोर्चाला खासदार संजय राऊत, बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबईतील काही नेते राहणार उपस्थित

- पालिकेतील भ्रष्टाचार, खड्डे, वाढलेली गुन्हेगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह जिल्ह्यातील अन्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संयुक्त मोर्चाचे नियोजन

- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत मिळत असतानाच नाशिकमधील मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चाला महत्व

- संयुक्त जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही पक्ष करणार आज नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन

- मुंबईनंतर नाशिकमधील प्रश्नांवर पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येऊन काढणार मोर्चा

- दोन्ही पक्षांकडून मोर्चाची जय्यत तयारी

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाकडून नागपूर खंडपीठात धाव

- राज्य सरकारने 2 सप्टेंबर काढण्यात आलेल्या शासन जीआरचा विरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाकडून नागपूर खंडपीठात धाव

- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी यांनी केली याचिका दाखल.

- सरकारने त्या परिपत्रकात घोळ करत परिपत्रक काढलेत.. दोन दोन कागद काढले एका कागदात एक विषय आणि दुसऱ्या पत्रकात दुसरा विषय त्यात शब्द बद्दलविण्यात आल्याचा आरोप..

- या परीपत्रकाच मूल्यांकन आणि अभ्यास केला... हा जीआर ओबीसीच्या विरोधात जाणारा आहे, मराठा व्यक्तीला कुणबी बनविण्याचा प्रयत्न असून त्याचा निषेध नोंदवला आहे..

- मागासवर्गीय वैध ठरवण्यासाठी ज्या कार्यपद्धतीच्या अवलंब केला जातो, त्या विरोधात जाऊन हे परिपत्रक विशेष समाजासाठी फायदा पोहोचवण्यासाठी हे काढल असल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे..

- ही कार्यपद्धती अवैध आहे याच्या विरोधात आम्ही याचिका दाखल केली आहे.

- कदाचित सोमवारी याचिकेकर सुनवाई होईल यावर कोर्ट काय निर्णय देईल याकडे आमचं लक्ष आहे.

Nagpur: 18 सप्टेंबर रोजी महिला आयोगाची नागपुरात जनसुनावणी

"महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत जिल्हा नियोजन भवनात सकाळी 11 वाजता जनसुनावणीचे आयोजन..

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तक्रारीची सुनावणी घेणार..

महिलाना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रतक्ष उपस्थित राहणे आर्थिक दृष्ट्या तसेच ईतर कारणामुळे शक्य होत नाही..

त्यामुळे महिला आयोग जिल्हास्तरावर पोहचून महिलांच्या तक्रारीची सुनावणी घेत आहे..

या जनसुनावनीला पोलिस, जिल्हा प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक जिल्हा समन्वयक आदी उपस्थित राहतील..

तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करून, तक्रारी मांडणाऱ्या महिलाना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करणार..

Pune crime : चोरीची रिक्षा,मध्यरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या चार आरोपींना बेड्या

पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अजब प्रकार

चोरीच्या रिक्षातून प्रवासी भाडं घेत प्रवाशांना मारहाण करत लुटणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक

एका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून रिक्षात चोरत दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जात आरोपी प्रवाशांची करत होते लूट

लोणी काळभोर पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह तिघांना केली अटक

पुणे -सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती हद्दीत रिक्षातील प्रवासी इसमाला मारहाण करत आरोपी करत होते चोरी

अदिल लतीफ शेख, (वय -24), हबिब सिराज शेख, (वय 21), बबलु मुन्नालाल अग्रवाल, (वय-19, रा. गल्ली नं -3, रा. सय्यद नगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

Pune News : पुण्यात अपघाताचा बनाव रचून मोबाईल लुटणारे तिघेजण ताब्यात

रात्रीच्या अंधारात अपघाताचा बनाव रचून तरुणाला मारहाण करून दोन मोबाईल लुटणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत.

फिर्यादी सहा सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चव्हाणनगर कमान चौकाजवळून निघाले होते. त्यावेळी कात्रजकडून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

फिर्यादी खाली उतरल्यावर आरोपींनी उलट त्यांना शिवीगाळ केली.‘आम्हाला पायाला लागले, दहा हजार रुपये खर्च दे,’ अशी दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने फिर्यादीचे दोन मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाले.

या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला येथील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नराधमाच्या क्रूर अनैसर्गिक लैंगिक अत्याचारामुळे मुलीच्या गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्या होत्या.त्यामुळे मुलीच्या गुप्तांगांवर मोठी शस्त्रक्रिया करून तिच्यावर उपचार करण्यात आल्याचा उल्लेख करत विशेष न्यायाधीश यांनी हा निकाल दिला.

याबाबत मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार बापावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाच फेब्रुवारी २०१८ ला हा प्रकार घडला होता.

कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलपासून लवकरच दिलासा?

Raju Shetti Petition : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नाही . त्यानुसार कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात माजी खासदार राजू यांनी दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नाही . त्यानुसार कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात माजी खासदार राजू यांनी दाखल केली.

Ambegoan मंचरमध्ये मशिदीचा भाग कोसळला; भुयार आढळल्याने खळबळ 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर शहरात मध्यवर्ती भागातील दर्ग्याखाली (मशिदीखाली) सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. या ठिकाणी भुयारासारखी रचना दिसून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त लावून पाहणी केली असता, भुयारात कबर व्यतिरिक्त काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यामुळे रात्री उशिरा तणाव निवळला असून मुस्लिम समाजाच्या वतीने मंचर नगर पंचायत व पोलिस प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत.

Maharashtra Live News Update: अंबरनाथमध्ये सात बांग्लादेशी घुसखोर पकडले

अंबरनाथमध्ये बुधवारी पोलिसांनी ७ बांग्लादेशी घुसखोरांना बेड्या ठोकल्या. शिवगंगा नगर आणि कल्याण परिसरात ते भाड्याने वास्तव्यास होते. पकडलेल्या घुसखोरांमध्ये सहा महिला आणि एक पुरुष असून त्यात शिपा बलून पठाण, शर्मिन मोनेरुल इस्लाम, रिमा सागर अहमद, सुमया अबुल कासिम, पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर, जोया जास्मिन मतदार आणि रॉकी रहीम बादशाह यांचा समावेश आहे. हे सर्व परत विमानाने बांग्लादेशात पाठवले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान, या कारवाईनंतर शहरात एटीएस आणि एनआयएने पाकिस्तानी नागरिक पकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं जप्त केल्याची अफवा पसरली होती. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि त्यावर विश्वासही ठेवू नये, असं आवाहन परिमंडळ ४ चे डीसीपी सचिन गोरे यांनी केलं.

भारतीय नौदलाला पहिले स्वदेशी सर्व्हिलान्स रडार 3D-ASR-Lanza-N मिळाले

भारतीय नौदलाला पहिले स्वदेशी सर्व्हिलान्स रडार 3D-ASR-Lanza-N मिळाले आहे. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ने स्पॅनिश कंपनी इंद्रासोबत तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या मदतीने हे विशेष रडार बनवले आहे. असे रडार बनवणारी ही पहिलीच भारतीय कंपनी आहे. संरक्षण स्वावलंबनाच्या भारताच्या प्रयत्नात ही कामगिरी एक महत्त्वाचे पाउल मानले जाते. 

रडारला या युद्धनौकेवर बसवण्यापूर्वी, त्याच्या विस्तृत समुद्री चाचण्या घेण्यात आल्या आहेत. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ने या संदर्भात एक प्रेस रिलीज देखील जारी केली आहे. यामध्ये कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुकरण सिंह म्हणाले, इंद्रा कंपनीसोबतचे आमचे सहकार्य भारतातील रडार उत्पादन क्षमता मजबूत करण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. जमीनवरील समन्वय, तांत्रिक कौशल्य आणि मजबूत पुरवठा साखळीद्वारे आम्ही प्रगत संरक्षण तंत्रज्ञानासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com