महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री; १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा, काँग्रेसलाही पडले भारी

MIM winning candidate : महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री केली आहे. १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा एमआयएमने केला आहे.
MIM winning candidate
MIMSaam tv
Published On
Summary

राज्यात एमआयएम पक्षाची हवा

120 नगरसेवक निवडून आल्याचा एमआयएमचा दावा

मुंबईतही जिंकले ५ उमेदवार

राज्यातील 29 महानगरपालिकेमध्ये एमआयएम पक्षाने 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणलेत. 120 नगरसेवक निवडून आल्याचा दावा एमआयएम पक्षाने केला आहे. त्यात सर्वाधिक संख्या ही छत्रपती संभाजीनगरमध्ये ३३ आहे. त्या पाठोपाठ मालेगाव मध्ये 21, नांदेडमध्ये 14 तर अमरावतीमध्ये 11 नगरसेवक निवडून आले आहेत.

महाराष्ट्रातील यशावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इम्तियाज जलील म्हणाले, 'महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जितकं यश एमआयमला मिळालं नव्हतं, त्यापेक्षा तितकं मोठं यश यावेळी मिळालेलं आहे. आम्हाला विश्वास आहे की शंभर पेक्षा जास्त नगरसेवक एमआयएमचे राज्यात निवडून आलेले आहेत'.

MIM winning candidate
मुंबई नव्हे, मराठवाड्यात ठाकरे गटाची लाट; महापालिकेवर झेंडा रोवणार

विजयी उमेदवारांची आकडेवारी

संभाजीनगर: ३३

मालेगाव २१

नागपूर ७

जालना २

धुळे १०

नांदेड १४

गोवंडी ५

मुंब्रा ६

अकोला ३

अमरावती ११

अहमदनगर २

परभणी १

एकूण ११५

MIM winning candidate
मुंबई नव्हे, मराठवाड्यात ठाकरे गटाची लाट; महापालिकेवर झेंडा रोवणार

मुंबईत एमआयएमचे पाच उमेदवार विजयी

१) प्रभाग क्रमांक 136 मधून एमआयएम चे जमीर कुरेशी विजयी..

जमीर कुरेशी यांना एकूण 14,921 मते

जमीर कुरेशी यांचा 9923मतांनी विजयी..

२) प्रभाग क्रमांक 137 मधून पटेल समीर रमजान यांचा विजय

प्रभाग क्रमांक 137 मध्ये एमआयएमचे पटेल शमीर रमजान यांचा 4568 मतांनी विजय..

३) प्रभाग क्रमांक १३४ मधून मेहजबीन अतिक अहमद विजयी ८४१४

४) प्रभाग क्रमांक १४५ खैरनूसा अकबर हुसेन ७६५३ मत विजयी

५) प्रभाग क्रमांक १४० , विजय उबाळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com