Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

MLA Rohit Pawar Social Media Post On Jamkhed Hotel Firing : जामखेड हॉटेल गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण सुरक्षित असल्याचं सांगितलंय. गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नावही रोहित पवार असल्याने गोंधळ उडाला होता.
MLA Rohit Pawar  Social Media Post On Jamkhed Hotel Firing
MLA Rohit Pawar posts clarification on social media after confusion over Jamkhed firing incident.saam tv
Published On
Summary
  • जामखेडमध्ये एका हॉटेलवर अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली.

  • हॉटेल मालक रोहित अनिल पवार या गोळीबारात जखमी झाले.

  • नाव समान असल्याने आमदार रोहित पवार यांच्याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला.

अहिल्यानगमधील जामखेडमध्ये एका हॉटेलवर गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात हॉटेल मालक रोहित अनिल पवार हे जखमी झाले होते. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. परंतु या गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नाव रोहित पवार असल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. अनेकांना आमदार रोहित पवार यांच्यावर गोळीबार झाल्याचं वाटलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान या गोळीबार प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण सुखरुप असल्याचं सांगितलं.

MLA Rohit Pawar  Social Media Post On Jamkhed Hotel Firing
Haryana Government: भाजपचं सरकार संकटात; काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव

रोहित पवार यांचे ट्विट

बातमीमधील नामसाधर्म्याने घोळ झाला.. जामखेडमधील गोळीबारात मी नाही तर हॉटेलमालक #रोहित_अनिल_पवार हे जखमी झाले आहेत. पण प्रत्येक व्यक्ती मीच आहे असं समजून त्यांना न्याय मिळण्यासाठी मी कायम लढतो आणि लढत राहील. काळजीपोटी अनेकांनी फोन केले, त्या सर्वांचे मनापासून आभार, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलंय.

MLA Rohit Pawar  Social Media Post On Jamkhed Hotel Firing
मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; मालक रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

हॉटेल कावेरीवर गोळीबार प्रकरण

जामखेडमधील एका हॉटेलवर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड-बीड रोडवरील न्यू कावेरी हॉटेलवर बुधवारी मध्यरात्री गोळीबार झाला. या हॉटेलच्या मालकाचे नाव रोहित अनिल पवार आहे. ते आपल्या हॉटेलच्या समोर उभे होते. त्यावेळी एक स्विफ्ट कार आली, त्या कारमधून ५ ते ७ जण उतरले.

त्यातील ३ जणांकडे गावठी कट्टे होते. या तिघांनी हॉटेलवर गोळीबार सुरू केला. त्यावेळी मालक रोहित अनिल पवार आपला जीव वाचवण्यासाठी हॉटेलमागे पळाले. त्यावेळी त्यांच्या पायाला गोळी लागली. अंतर पळून गेल्यानंतर ते अंधारात लपवून बसले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबार केल्यानंतर कारमधून आलेले गुंड तेथून निघून गेले. त्यानंतर अजून एका कारमधून अजून काहीजण तेथे आले. त्यांनी हॉटेलची तोडफोड केली. हॉटेल मालक रोहित पावर यांच्या कारच्या काचा देखील त्यांनी फोडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com